दामोदर मावजो
दामोदर मावजो Dainik Gomantak
गोवा

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला थारा आहे का: एन. राम

दैनिक गोमन्तक

सासष्टी: देशाच्या घटनेच्या प्रस्तावनेत ज्या प्रकारचे स्वातंत्र्य नागरिकांना आवश्यक आहे, त्याचे खरोखरच पालन होते का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याला देशात थारा आहे का? असे अनेक प्रश्र्न सध्याच्या परिस्थितीत उपस्थित होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे प्रयत्न चालू आहेत. तरीसुद्धा अजून आणीबीणीची परिस्थिती आलेली नाही. जेव्हा जेव्हा असे प्रयत्न केले जातात, तेव्हा त्याला प्रतिकार केला जातो. म्हणूनच अजूनही स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. धोका आहे, पण सर्वांनीच दक्ष राहणे महत्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत व द हिंदू पब्लिकेशनचे संचालक एन. राम यांनी व्यक्त केले.

गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक व ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांचा आज मडगावात रवींद्र भवन सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. उदय भेंब्रे, लेखक व भाषांतरकार जुझे लॉरेन्स, उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ, साहित्यिक, कोकणीप्रेमी व मावजो यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ज्ञानपीठ’ हा एखाद्या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार नाही तर तो साहित्यिकाच्या साहित्य योगदानाला मिळालेला पुरस्कार असल्याचे अॅड. उदय भेंब्रे यांनी सांगितले. पुरस्कार म्हणजे अंतिम ध्येय नसावे. ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने कोकणी माणसाचा आत्मविश्र्वास वाढविला. तो टिकवणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

प्रसाद लोलयेकर यांनी दामोदर मावजो यांच्या स्वभावगुणांवर प्रकाश पाडला. हा कोकणीच्या पुरोगामी, नितीमत्तेचा, सर्वसमावेशक दृष्टीचा गौरव असल्याचे ते म्हणाले. मावजो यांनी वाचकांची अभिरुची वाढवली. त्यांचे मोठेपण त्यांच्या प्रांजळ स्वभावात असल्याचे लोलयेकर म्‍हणाले.

दामोदर मावजो यांनी कोकणी भाषा इतर राज्यांमध्ये तसेच विदेशात पोहोचविल्‍याबाबत आढावा घेतला. अन्वेषा सिंगबाळ यांनी सर्वांचे स्वागत केले. समीक्षा पै धुंगट यांनी मानपत्राचे वाचन केले तर अनंत अग्नी यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांसाठी सज्ज राहा! संदीप जॅकीस यांच्या सूचना

Panaji News : सांतिनेज खाडीतील गाळउपसा पूर्णत्वाकडे; साडेतीन किलोमीटरच्या जलप्रवाहाला पुनरुज्जीवित करणार

SCROLL FOR NEXT