Mahanand Naik documentary A Still From Mahanand Naik documentary
गोवा

Dupatta Killer Documentary: पुस्तकानंतर आता सिरियल किलर महानंदवर येतेये डॉक्युमेंट्री, 16 खुनांचा धरारक मागोवा

Mahanand Naik Serial Killer: महानंद नाईक याच्यावर आधारित ही डॉक्युमेंट्री येत्या 21 मार्च रोजी स्ट्रीम होणार आहे.

Pramod Yadav

Mahanand Naik documentary

पणजी: लग्नाचे आमिष दाखवून भोळ्‍याभाबड्या युवतींवर अत्‍याचार करून अखेर त्यांचा खून करणाऱ्या सिरियल किलर महानंद नाईकवर आता डॉक्युमेंटरी येत आहे. काही दिवसांपूर्वी महानंदवर आवदा व्हिएगस यांनी लिहलेले ‘अ सायलेंट इन्व्हेटरेट सिरीयल किलर’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून महानंद केलेल्या 16 खुनाचा मागोवा घेतला जाणार आहे.

महानंद नाईक याच्यावर आधारित ही डॉक्युमेंट्री येत्या 21 मार्च रोजी स्ट्रीम होणार आहे. पॅट्रीक ग्रॅहम यांनी या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शन केले आहे. महानंदने महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या लैंगिक अत्याचार करायचा आणि विश्वासात घेऊन निर्जनस्थळी त्यांचा दुपट्ट्याने गळा आवळून खून करायचा. तसेच, तो महिलांच्या अंगावरुन दागिने लुटून पोबारा करायचा. 1994 ते 2009 असे 15 वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत दुष्कर्म करत राहिला.

महानंद नाईकची संपूर्ण गोव्यात दहशत निर्माण झाली होती आणि पोलिसांपुढे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. 11 सप्टेंबर 1995 रोजी बेतोडा येथे निर्जनस्थळी महानंदने एका महिलेचा खून करून दागिने पळविले असा आरोप त्याच्यावर होता. या खुनाची कबुली महानंद नाईकने तब्बल 14 वर्षानंतर 3 मे 2009 रोजी दिली. विशेष म्हणजे याच प्रकरणात 1995 मध्ये त्याला अटक झाली होती. मात्र, पुराव्या अभावी त्याला सोडावं लागले होते.

माजी पोलिस उपअधीक्षक सी.एल. पाटील यांनी याप्रकरणाचा कसून तपास करुत महानंद नाईकला शिक्षा होण्यात महत्वाची भूमिका बजावली. अलिकडेच आवदा व्हिएगस यांच्‍या ‘अ सायलेंट इन्व्हेटरेट सिरीयल किलर’ या पुस्‍तकात देखील महानंदच्या कुकर्मांचा मागोवा घेण्यात आला आहे. दरम्यान, पॅट्रीक यांच्या डॉक्युमेंट्रीतून महानंदच्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती रुपेरी पडद्यावर पाहण्यास मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT