Goa Fraud Case  Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: थिवीतील डॉक्टरला घ्यायचे होते कर्ज! बँक कर्मचारी असल्याचे भासवत तिघांंनी केली 8 लाखांची फसवणूक

याप्रकरणात सहभागी असलेल्या तिघांवर कोलवाळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला

Kavya Powar

Goa Fraud Case : थिवीमध्ये क्लिनिक असलेल्या एका डॉक्टरसोबत लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्या तिघांवर कोलवाळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, थिवी येथे क्लिनिक असलेल्या एका डॉक्टरांना वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी 93 लाखांचे कर्ज घ्यायचे होते. यावेळी त्यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी सुशांत कंठक (मडगाव) याच्याशी यासंदर्भात चर्चा केली. सदर आरोपीने डॉक्टरांची ओळख अनंत दत्ताराम वालावलकर (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) याच्याशी करून दिली.

संशयित अनंतने आपण बँक अधिकारी असल्याचे भासवत या प्रकरणातील तिसरा आरोपी कामत (जेलरोड, रत्नागिरी, महाराष्ट्र) याची ओळख डॉक्टरांशी करून दिली. आपण बँकेतर्फे कर्ज मंजुरीचे व्यवहार सांभाळत असल्याचे कामत याने डॉक्टरांना सांगितले.

आरोपींनी आपल्या बोलण्यातून डॉक्टरांना आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून त्यांना गुंडाळले आणि अनंत वालावलकर याच्या वैयक्तिक खात्यामध्ये 8,67,000 लाख रुपये भरण्यास प्रवृत्त केले.

डॉक्टरांनीही त्यांच्यावर विश्वास टाकत ही रक्कम अधिकृत बँक खात्यात जमा न करता आरोपीच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा केली. मात्र त्यानंतर कर्मचारी म्हणून भासवलेले हे आरोपी कर्ज देण्यास असमर्थ ठरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आला.

त्यानंतर त्यांनी पोलिसात या तिघांविरोधातही तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात भादंसंनुसार 419, 420 r/w 34 गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT