Couple On Honeymoon in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात हनिमूनला आलेल्या डॉक्टरचा इरादा बदलला; गळा दाबून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला, 7 जणांवर गुन्हा

Uttar Pradesh Crime: नवविवाहितेने तिच्या सासरच्या मंडळींकडून गोव्याला जाताना झालेल्या छळाची कहाणी पोलिसांना सांगितली.

Pramod Yadav

उत्तर प्रदेश: महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याची हनिमून ट्रिप हायव्होल्टेज ड्रामामध्ये रुपांतर झाले. जोडपे हनिमूनसाठी गोव्यात आले होते. पण, दोन दिवसांनी विवाहित मुलीने रडत रडत तिच्या घरच्यांना फोन केला, त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला घरी बोलावून घेतले.

मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठून पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत पतीसह सात जणांविरुद्ध मारहाण, हुंड्यासाठी छळ यासह अन्य आरोप करण्यात आले आहेत.

कोतवाली येथील रहिवासी असलेल्या या तरुणीचा विवाह १२ फेब्रुवारी रोजी निचलौल येथील रत्नेश गुप्ता याच्याशी झाला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच छळ सुरू झाल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे.

सासरी गेल्यावर तिचा छळ सुरु झाल्याचा आरोप तरुणीने केला आहे. दरम्यान, सुरुवातीला झालेल्या वादावर घरच्यांनी बैठक घेऊन वाद तोडगा काढला होता. यानंतर दोघेजण १९ फेब्रुवारी रोजी हनिमूनसाठी गोव्याला रवाना झाले.

पती व सासरच्यांविरुद्ध तक्रार

डॉक्टर पतीने गोव्यातही तिच्यावर (मुलीला) मारहाण केल्याचा आरोप आहे. मुलीने या घटनेची माहिती घरच्यांना दिली. मुलीच्या घरच्यांनी २२ फेब्रुवारी रोजी मुलीला घरी बोलावले. त्यानंतर तिने पती आणि सासरच्या मंडळींची तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले.

नवविवाहितेने तिच्या सासरच्या मंडळींकडून गोव्याला जाताना झालेल्या छळाची कहाणी पोलिसांना सांगितली. पतीने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे मुलीने सांगितले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कोतवाली येथे राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेला मारहाण, हुंड्यासाठी छळ केल्याचे अनेक आरोप केले आहेत. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. तपासात जे तथ्य समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

Goa Live News: 56th IFFI ईफ्फीत दिसलो सनी देवोलाचो हमशकल; Watch Video

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT