रावण गावातील मंदीर Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील चार वाड्याचं 'रावण' गाव; सांस्कृतिक वैभवाचा जपला वारसा

रावणाचा आणि या गावाचा तसा काही संबंध नाही, पण गावातील...

Dashrath Morajkar

पर्ये: महाराष्ट्राच्या सीमेवर (Sattari) वसलेले सत्तरी तालुक्‍यातील रावण गाव हा कृषी (Agriculture) संस्कृती जोपासणारा आहे. गावात असलेल्या डोंगर टेकड्या व त्या टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले भातशेतीचे मळे यामुळे हा गाव समृद्ध आहे. एकाबाजूने या परिसरात जंगली जनावरांचा हैदोस होत असताना देखील येथील कष्टकरी लोक भातशेती पिकवतात हे विशेष. तसेच इथल्या डोंगर पठारावर काजू लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने काजू हे आर्थिक उत्पन्न देणारे मुख्‍य पीक आहे. अंजुणे धरणाचा कालवा या गावातून गेल्याने शेती, बागायतीमध्‍ये हा गाव ‘सुजलाम सुफलाम’ आहे. त्यामुळे येथे माड-पोफळीची लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. (Do you know about Ravana Village in Goa?)

रावण गावाला सांस्कृतिक वैभवाची विशेष परंपरा लाभली आहे. गावात सातेरी केळबायच्‍या मुख्य मंदिरासह महादेवाचे मंदिर आहे. त्या व्यतिरिक्त चव्हाटेश्‍वर, गोठणेश्वर आदी देवस्थाने आहेत. शिगमोत्सव हा गावाचा सर्वांत मोठा उत्सव. सात दिवस चालणाऱ्या शिगमोत्सवात करवली उत्सव, घोडेमोडणी आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात.

रावण गावात एकूण चार वाडे आहे. यापैकी वरचावाडा, मधलावाडा व पलतडवाडा हे एकमेकांना लागून आहे तर पेळावदा हा वाडा गावाच्‍या दुसऱ्या बाजूला मोर्ले गावाला लागून आहे. रावण महसुली गावामध्ये अंजुणे धरणाचा बुडीत क्षेत्रातील ‘केळावडे’ हा गाव रावण येथे पुनर्वसित केला आहे व तो ‘रावण कॉलनी’ या नावाने ओळखला जातो.

गाव आणि रावण...

या गावाला रावण नाव कसे पडले याबद्दल ठोस माहिती उपलब्‍ध नाही. रामायणात रावण हा लंकानगरीचा राजा होता. या रावणाचा आणि या गावाचा तसा काही संबंध नाही. पण गावातील महादेवाच्या मंदिरात एक विशिष्ट शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या योगीपीठावर 32 नागांची चित्रे कोरलेली आहेत. रावण हा शिवभक्त होता आणि येथील हे वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग या रावणाशी संबंधित आहे, असाही एक मतप्रवाह आहे. पण दुसऱ्या बाजूने मात्र रावण गाव लहान-मोठ्या डोंगरांनी वेढलेला आहे. या डोंगरावर पूर्णपणे वनराजी आहे. मोठ्या वनातील गाव म्हणून ‘रावण’ असा दुसरा मतप्रवाह आहे. पण नक्की या गावला नाव रावण कसे पडले हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. गोव्यात मडगाव भागात रावणफोंड आणि सांगे व काणकोण तालुक्याच्या सीमेवर असलेला रावण डोंगर आहे. पण या दोन्ही ठिकाणांचा या गावाशी काही संबंध नाही.

250 घरे, सुमारे 1200 लोकसंख्‍या : गावाला पर्ये, मोर्ले व घोटेली या गावांच्या सीमा जुळलेल्या आहे तर दुसऱ्या बाजूने आयी व तळेखोल या महाराष्ट्राच्या गावांच्या सीमा लागलेल्या आहेत. 554 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या गावात सुमारे 250 घरे व लोकसंख्या 1200च्या आसपास आहे. गावातील अळमो हा मुख्य डोंगर आहे. त्याचबरोबर इतर लहान मोठी पठारे आहेत. देवसाची शेत, करमळीचे शेत, दाबे हरलाचे शेत, माणूक तळ्याचे शेत आहे. इथले कष्टकरी लोक ही शेते पिकवतात, पण ‘मोकाशेशाही’ची दृष्ट या गावाला लागल्याने गावातील बहुतेक जमिनींची मालकी येथील कष्टकरी जनतेकडे नाही ही मोठी शोकांतिका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT