Goa: "भंडारी समाज ज्ञातीतील बेरोजगारांना न्याय द्या"

भंडारी समाजाचे साखळी (Sanquelim) येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. सावंत (Pramod Sawant) यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भंडारी समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भंडारी समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.Dainik Gomantak

डिचोली: आरक्षण कोट्याचा (Reservation Quota) विचार करून नवीन नोकर भरतीत (Recruitment) प्राधान्य देवून भंडारी समाज ज्ञातीतील बेरोजगारांना न्याय द्यावा. अशी मागणी डिचोली तालुका भंडारी समाजातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याकडे केली आहे. (Statement demanding justice for Bhandari community was given to the Chief Minister Pramod Sawant)

समाजाचे डिचोली तालुका अध्यक्ष आनंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी सायंकाळी साखळी येथे रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पाठींबा जाहीर करताना, समाज बांधव पूर्णपणे पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या या शिष्टमंडळात उपाध्यक्ष मनोजकुमार घाडी, दुलबा नाईक, सचिव श्रीपाद कारबोटकर, सदस्य शंकर नाईक, नरेश नाईक, अजित नाईक आणि अविनाश होबळे यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भंडारी समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
Goa: सरकारने लोकशाहीचा अक्षरशः खून केलाय- प्रमेश मयेकर

मयेतून विचार व्हावा

भंडारी समाज बांधवांचे प्राबल्य असलेल्या मये मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भंडारी समाज ज्ञातीतील नेतृत्वाला उमेदवारी द्यावी. अशी मागणीही या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. याशिवाय डिचोली तालुक्यात भंडारी समाज भवन उभारण्यासाठी सहकार्य करावे. आदी मागण्यांही शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी समाजाच्या मागण्या ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मनोजकुमार घाडी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com