मडगाव : पावसाने धरलेला जोर व सोनसोडो प्लांटकडील रस्त्याची खराब अवस्था लक्षात घेऊन गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने मडगाव नगरपालिकेला सोनसोडोवर उघड्या जागेत कचरा टाकू नका, असे बजावले आहे.
प्लांटमध्ये टाकलेल्या रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल, अशी तेथील यंत्रसामग्रीची दुरुस्ती करावी, प्लांट बसवलेली लिचँड टाकी नियमितपणे रिकामी करावी व ती भरून उतू जाणार नाही याची काळजी घ्यावी, असेही महामंडळाने सुचवले आहे. (Do not throw trash in the open place Solid Waste Management Board Notice to Margao Municipality)
सोनसोडो रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेल्या आठवड्यात ट्रकमधून कचरा उतरवता आला नव्हता. त्यामुळे नवी समस्या उभी ठाकली होती. त्या अनुषंगाने महामंडळाची ही सूचना महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर गेल्या वर्षभरात प्लांटसभोवताली टाकलेला कचरा उचलून तो राशींवर टाकण्यात आला व नंतर त्या राशी झाकण्यात आल्या.
म्हणजेच महामंडळाला त्यावर आणखी कचरा आलेला नको आहे. दुसरीकडे राशीवरील रेमिडिएशन पावसामुळे बंद करण्यात आले. महामंडळाने शेडमध्ये साचलेल्या कचऱ्याचे रेमिडिएशन सुरू केले आहे. गत एप्रिलमधील मंत्री मोन्सेरात यांच्याकडील भेटीत हा निर्णय घेण्यात आला होता. तेथे सुमारे 14,380 घनमीटर कचरा आहे.
दरम्यान, महामंडळ नियुक्त ठेकेदाराने कचरा राशीतील सुमारे 15 हजार घनमीटर कचऱ्याचे या उन्हाळ्यात रेमिडिएशन केले. उरलेले काम पावसाळ्यानंतर पुढे हाती घेतले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.