Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: बाळाशी डीएनए जुळला नाही..., बलात्काराच्या आरोपातून मोरपिर्ला येथील युवक निर्दोष मुक्त

कुंकळी येथील अल्पवयीन मुलीने दिलेला बाळाला जन्म

Akshay Nirmale

Goa Crime News: एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिच्यावर मातृत्व लादल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या मोरपिर्ला केपे येथील नीलेश गावकर या तरुणाला बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

संबंधित मुलीने जन्म दिलेल्या बाळाशी नीलेश गावकर याचा डीएनए जूळन आला नाही. त्यामुळे नीलेशची दक्षिण गोव्याच्या अतिरीक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात संशयिताच्या वतीने ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी बाजू मांडताना आपल्या अशिलाला या प्रकरणात विनाकारण गुंतविल्याचा दावा केला. हा दावा न्यायालयाने मान्य केला. या प्रकरणात तीन साक्षीदारांच्या साक्षी सादर करण्यात आल्या.

ही घटना 30 डिसेंबर 2020 या दिवशी घडली होती. कुंकळी पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला होता. जन्मानंतर या मुलीने या बाळाला सोडून दिले होते. पोलिसांनी शोध घेत संबंधित मुलीला शोधले.

तिला ताब्यात घेतल्यावर तिने नीलेश गावकर याने मार्च महिन्याच्या दरम्यान तिच्यावर बलात्कार केला होता असे सांगितले. त्यातून आपण गर्भवती राहून या बाळाला जन्म दिल्याचे तिने सांगितले होते.

त्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. पोलीसांनी नीलेश याला अटक केली होती. नीलेशने तो निर्दोष असल्याचे सांगितले होते. अखेर नीलेश आणि जन्मजात बाळाची डीएनए टेस्ट करून दोघांमध्ये काही नाते आहे का हे पडताळणी करून पाहायचे ठरले.

त्यानंतर दोघांचेही नमुने घेत डीएनए चाचणी केली असता ती जुळून आली नाही. त्यामुळे नीलेशचा बाळाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. अभियोग पक्ष संशयितावरील आरोप कुठल्याही प्रकारे सिद्ध करू शकला नाही, असे नमूद करीत त्याला निर्दोष मुक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT