Diwali Shopping Dainik Gomantak
गोवा

Diwali Shopping: पणजी बाजारात गर्दी, अन् वाहतूक कोंडी! विविध प्रकारच्या पणत्या, आकाशकंदील आणि रांगोळी साहित्याची रेलचेल

Panaji Market: दिवाळीच्या सणाला वसुबारसेपासून सुरुवात झाली असून, आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी पणजी मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दिवाळीच्या सणाला वसुबारसेपासून सुरुवात झाली असून, आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी पणजी मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. दिवाळीसाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यासाठी पणजीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी बाजारपेठेत धाव घेतली. वाढत्या महागाईची झळ सोसत का होईना, पण सणाचा उत्साह कायम ठेवत नागरिक खरेदी करताना दिसत होते.

दिवसेंदिवस महागाई वाढत असली, तरी दिवाळीसाठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करण्याचा उत्साह नागरिकांमध्ये दिसून येत होता. श्रीमंतांसह मध्यमवर्गीय कुटुंबांचीही बाजारात मोठी उपस्थिती होती. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार थोडीफार खरेदी करून दिवाळीचा सण साजरा करण्याची तयारी अनेकांनी केली आहे.

पणत्या तयार करणाऱ्या स्थानिक कारागिरांनी विविध प्रकारच्या पणत्या, आकाशकंदील तसेच रांगोळी साहित्य विक्रीसाठी बाजारात आणले आहे. त्यामुळे पणजी मार्केट परिसरात दिवाळीच्या साहित्याची रेलचेल पाहायला मिळत आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त गोव्यात स्थायिक झालेली अनेक कुटुंबेही दिवाळीच्या खरेदीसाठी पणजी मार्केटला पसंती देत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.

दुसरीकडे, वाढत्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण येत आहे. बाजार परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्याची जबाबदारी काही ठिकाणी होमगार्ड सांभाळताना दिसत होते. विशेषतः सायंकाळच्या वेळी महानगरपालिका मार्केटसमोरील रस्त्यांवर वाहनांची मोठी कोंडी होत होती. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता असतानाही त्यांची उपस्थिती फारशी जाणवत नव्हती. सकाळच्या वेळी मात्र शहरातील काही ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात असल्याचे दिसले. तसेच नो पार्किंग क्षेत्रात उभी केलेली वाहने हटविण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथकही कार्यरत होते.

...वाहतुकीचा ताण!

सायंकाळी १८ जून मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. खरेदीसाठी आलेल्या चारचाकी वाहनांना बाजारातून बाहेर पडण्यासाठी अनेकदा याच मार्गाचा वापर करावा लागतो. बांदोडकर मार्गावर जाण्यासाठीही वाहनचालकांना याच मार्गावरून उत्तरेकडील रस्ता पकडावा लागत असल्याने वाहतुकीचा ताण वाढत होता. चर्च स्क्वेअरपर्यंत सायंकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत वाहनांची वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहासोबतच वाहतूक कोंडीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thyroid Test Report: थायरॉईड रिपोर्टमध्ये दडलेले असतात आरोग्याचे संकेत! TSH, T3 आणि T4 म्हणजे काय? रिपोर्ट कसा वाचायचा ते समजून घ्या

Goa Ujjwala Scheme: दिवाळी आली, तरी 'उज्ज्वला'चे पैसे नाहीत! 1.61 लाख अर्जदार प्रतीक्षेत; 48.36 कोटींचे अनुदान रखडले

Vaibhav Sooryavanshi Captain: वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला कर्णधार! क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

Mohammed Shami Test Cricket Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'माझं एकच स्वप्न होतं...'

SCROLL FOR NEXT