Panjim Market Goa Dainik Gomantak
गोवा

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

Diwali Market in Goa: अवघ्या दोन दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपल्याने, पणजीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे

Akshata Chhatre

पणजी: अवघ्या दोन दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपल्याने, पणजीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. पणजी बाजारपेठेत सध्या दिवाळीच्या वस्तू, सजावटीचे साहित्य आणि पारंपरिक वस्तूंनी दुकाने फुलून गेली आहेत.

यंदाच्या दिवाळीत आकाशकंदिलांच्या दरात फारसा बदल झालेला नाही. आकार आणि कलाकुसरीनुसार हे कंदील ३०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पणजीचे मुख्य रस्ते खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे फुलून गेले आहेत.

बाहेरील व्यापाऱ्यांमुळे स्थानिक हैराण

बाजारपेठेत गर्दी दिसत असली तरी, गोमंतकीय स्थानिक व्यापारी मात्र चिंतेत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पणजी बाजारात बाहेरील राज्यांतील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. त्यामुळे स्थानिक दुकानदारांकडे येणारे ग्राहक कमी झाले आहेत.

गेल्या २५ ते ५० वर्षांपासून याच बाजारात व्यवसाय करणाऱ्या काही जुन्या दुकानदारांनी आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, "मागील अनेक वर्षांच्या तुलनेत आता धंदा होत नाहीये. बाहेरचे व्यापारी येऊन व्यवसाय करतात, ज्यामुळे आम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. आमचे ग्राहक त्यांच्याकडे वळत असल्यामुळे आमच्या व्यवसायावर थेट परिणाम होत आहे."

बाह्य व्यापाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक गोमंतकीय व्यापाऱ्यांचे व्यावसायिक अस्तित्व धोक्यात आले आहे, असे चित्र पणजीच्या दिवाळी बाजारात पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT