Goa Sports News
Goa Sports News Dainik Gomantak
गोवा

Goa Sports News: क्रीडापटू विद्यार्थ्यांना दिवाळी भेट

दैनिक गोमन्तक

Goa Sports News: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या पथकाने कधी नव्हे इतकी 92 पदके पटकावली. स्पर्धेतील 42 क्रीडा प्रकारांत गोमंतकीय खेळाडू सहभागी झाले होते. या पथकातील खेळाडूंत विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यांना बक्षिसे देण्याचा विचार शिक्षण खात्याने चालवला आहे. बक्षिसाचे स्वरूप काय असेल याची माहिती मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.

क्रीडा खात्याने वैयक्तिकरीत्या पदके मिळवलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 3, 2 व 1 लाख रुपयांचे रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. सांघिक यशाबद्दल अनुक्रमे 9, 6, 3 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्याशिवाय प्रशिक्षकांनाही गौरविण्यात येणार आहे. क्रीडा खात्याच्या या निर्णयानंतर शिक्षण खात्यानेही बक्षिसांची योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी माहिती संकलनाची तयारी करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांना दिवाळीची सुट्टी सुरू आहे, तरीही ही माहिती तातडीने मागवण्यात आली आहे.

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, शिक्षण सचिव पातळीवर या क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थी खेळाडूंना गौरविण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यानुसार माहिती संकलनाचे काम शिक्षण संचालनालयाकडे सोपवण्यात आले आहे. ती माहिती २५ नोव्हेंबरपर्यंत संकलित केली जाणार आहे. त्यानंतरच सरकारी पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे. याविषयी अधिक माहिती आता उपलब्ध नाही.

याबाबत शिक्षण उपसंचालक सिंधू देसाई यांनी जारी केलेल्या परिपत्रकात शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके जिंकली असल्यास त्याची माहिती विहित नमुन्यात 25 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने द्यावी असे नमूद केले आहे. त्यांनी परिपत्रक भाग शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

शिक्षकपदांसाठी ‘ऑफर लेटर’

शिक्षण खात्याने गेली तीन वर्षे रखडलेली प्राथमिक शिक्षकांची भरती मार्गी लावली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला 120 उमेदवारांना शिक्षकपदी भरती होण्यासाठी इच्छा प्रस्ताव शिक्षण खात्याने पाठवले आहेत. आज काही जणांना टपालातून हे इच्छा प्रस्ताव मिळाले आहेत. 17 नोव्हेंबरपर्यंत सरकारचा नियुक्तीचा प्रस्ताव स्वीकारत असल्याचे किंवा नाकारत असल्याचे या निवड झालेल्या उमेदवारांना कळवावे लागेल. 142 शिक्षक पदे भरण्यासाठीही ही प्रक्रिया आहे. आता दिव्यांगांसाठीची 7 आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील 14 पदे वगळून इतर पदांसाठी इच्छा प्रस्ताव जारी करण्यात आले आहेत.

गोवा क्रीडा प्राधिकरणाची घाई

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके मिळवणारे खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांना गौरवण्याचा निर्णय गोवा क्रीडा प्राधिकरणाने घेतला आहे. सोमवारी हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी विविध क्रीडा संघटनांना प्राधिकरणाकडून तोंडी स्वरूपात तशी सूचना करण्यात आली आहे. रविवारी वेळ व स्थळाविषयी कळवू असेही सांगण्यात आले आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने आणि स्पर्धाही संपल्याने अनेकांनी प्रवासाचे नियोजन केले आहे. तरीही सोमवारी गौरव सोहळा आयोजित करण्यावर प्राधिकरण ठाम राहिल्याने ही घाई कशासाठी असा प्रश्न चर्चेत आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT