Diwali festival 2025 Dainik Gomantak
गोवा

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Diwali Celebrations: बालगोपाळांसह सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा दीपावलीचा उत्‍सव तोंडावर आल्याने सध्या सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठाही फुलून गेल्‍या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: बालगोपाळांसह सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा दीपावलीचा उत्‍सव तोंडावर आल्याने सध्या सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठाही फुलून गेल्‍या आहेत. मात्र ग्राहकांचा ‘ऑनलाईन’ खरेदीकडे असलेला कल आणि त्यातच पावसाचे सावट यामुळे दुकानदार आणि विक्रेते चिंतेत सापडले आहेत.

दिवाळीच्‍या खरेदीसाठी ग्राहकांकडून अद्याप अपेक्षेप्रमाणे मोठा प्रतिसाद दिसून येत नाहीय. दुकानदार आणि विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत डिचोली बाजारपेठेत ५० टक्केही खरेदी झाली नव्हती, अशी माहिती दुकानदार आणि विक्रेत्यांनी दिली. रविवारी दिवाळीच्या पूर्वदिनी बाजारात खरेदीसाठी गर्दी उसळण्याची शक्यता असली तरी अलीकडे बहुतांश ग्राहकांचा कल ‘ऑनलाईन’ खरेदीकडे आहे.

गावठी पोह्यांसह गोड-तिखट पोहे, चकली, शंकरपाळी, लाडू, चिवडा आदी दिवाळीचा फराळ बाजारात दाखल झाला आहे. महिला स्वयंसाहाय्य गटांनी तयार केलेला फराळही बाजारात विक्रीस उपलब्ध आहे.

मिठाईची दुकाने काजूकतली, लाडू, कुंदा आदी विविध प्रकारच्या मिठाईने सजली आहेत. यंदा फराळ आणि मिठाई किंचित महाग झाली आहे. दरवर्षीप्रमाणे अजून फराळ आणि मिठाई खरेदीला प्रतिसाद मिळालेला नसला तरी उद्यापासून खरेदीला कदाचित जोर येण्याची आशा दुकानदारांना आहे.

खानापूर येथील पणत्या दाखल

बहुतांश स्थानिक कलाकारांनी पणती व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या काही वर्षांपासून डिचोलीच्या बाजारपेठेत राज्याबाहेरील पणत्यांची चलती आहे. सध्या दोडामार्गजवळील आयी गावासह कर्नाटकातील खानापूर येथील पणत्या विक्रीस आल्या आहेत. त्‍या ५० ते ६० रुपये डझन याप्रमाणे विकण्यात येत आहेत. रंगीबेरंगी पणत्यांचा दर दुप्‍पट आहे.

आकाशकंदील, नरकासुर मुखवट्यांना मागणी

पारंपरिक आकाशकंदीलही मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झाले आहेत. ५०० रुपयांपासून दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत त्‍यांचा दर आहे. नरकासुराच्या मुखवट्यांसह लहान आकाराचे रेडिमेड नरकासुर देखील उपलब्ध आहेत. कारीटे बाजारात आली असून दोन रुपये प्रतिनग असा त्‍यांचा भाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT