Diwali 2023 Dainik Gomantak
गोवा

Diwali 2023: चैतन्यपर्वाला प्रारंभ

Diwali 2023: आज लक्ष्मीपूजन: खाद्यपदार्थ, फराळाची रेलचेल

दैनिक गोमन्तक

Diwali 2023: आनंद, प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव म्हणजेच दिवाळी. रविवारी पहाटे झालेल्या नरकासुराच्या दहनाने दिवाळी सणाला प्रारंभ झाला. सायंकाळी नागरिक भक्तिभावाने लक्ष्मीपूजन करतील.

मंगळवारी बलिप्रतिपदा, अर्थात पाडवा साजरा होईल, तर बुधवारी भावा-बहिणीच्या अतूट नात्याच्या भाऊबिजेदिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून सुखा-समाधानाचे औक्षण करेल. एकूणच पुढील चार दिवस हा दिव्यांचा उत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दिवाळीची जय्यत तयारी सुरू होती. यासाठी सजलेल्या बाजारपेठांमधून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. यात पणत्या, आकाश कंदील, फटाके, फराळ, कपडे, सोन्या-चांदीचे दागिन्यांपासून वाहनांपर्यंत अनेक बाबींचा समावेश होता. यासाठी राजधानी पणजीसह राज्यातील मडगाव, फोंडा, म्हापसा, वास्को, काणकोण, पेडणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये शनिवारी संध्याकाळपर्यंत नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत होते.

रविवारी पहाटे नरकासुर दहनानंतर सकाळी खमंग पोहे, फराळाचा आस्वाद घेतला जातो. यंदा लक्ष्मीपूजन देखील आजच (रविवारी) असल्याने संध्याकाळी विविध आस्थापनांसह घरोघरी लक्ष्मी पूजन, आरती व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमावास्येचा क्षय झाला असल्याने काहीजण सोमवारीही लक्ष्मीपूजन करतील. मंगळवारी पाडवा असल्याने घरातील गोधनाची पूजा केली जाते. ग्रामीण भागात गोठ्यांमध्ये गौळण घातली जाते.

दिव्यांची सजावट आणि विद्युत रोषणाई

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा चैतन्याचा उत्सव म्हणजे दीपावली. राज्यात नरक चतुर्दशीला नरकासुर प्रतिमा दहनानंतर खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरवात होते. दिवाळीनिमित्त मंदिरे, दुकाने, विविध आस्थापने आणि घरांच्या प्रवेशद्वारावर आकाशकंदील, रोषणाईच्या माळा, मंद प्रकाश पेरणाऱ्या पणत्यांची आरास करण्यास सुरवात झाली. त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोने-चांदी खरेदीत वाढ

सराफी दुकानांतून सोने खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असून आर्थिक उलाढालही वाढली आहे. दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली असली, तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची रेलचेल आहे. भेटवस्तू देण्यासाठी मिठाई, सुका मेवा यांच्या खरेदीतही वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT