Crime News: खून प्रकरणातील सुनावणीच्या विलंबामुळे महिलेला जामीन

Crime News: घटना होऊन अडीच वर्षे उलटली तरी आतापर्यंत एकाच साक्षीदाराची जबानी नोंद झाली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Crime News: झेफेरिनो बार्रेटो याच्या खूनप्रकरणी कोठडीत असलेल्या युगांडाची संशयित मिनामू अफूसा (24) या महिलेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. घटना होऊन अडीच वर्षे उलटली तरी आतापर्यंत एकाच साक्षीदाराची जबानी नोंद झाली आहे.

Goa Crime News
Goa Sports News: क्रीडापटू विद्यार्थ्यांना दिवाळी भेट

तीनवेळा तिला जामीन फेटाळला आहे. ती फरार होण्याचा दावाही पोलिसांनी केलेला नाही, असे निरीक्षण खंडपीठाने जामीन देताना केले आहे.

कळंगुट पोलिसांनी आरोपपत्र सादर केल्यानंतर खटल्यावरील सुनावणी केव्हा संपेल हे माहीत नाही. खटल्यावरील सुनावणी ज्या गतीने सुरू आहे, त्याला संशयित जबाबदार नाही. जामीन दिल्यास ती फरार होईल किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करील, याबाबत कोणतीही माहिती पोलिसांनी समोर आणलेली नाही. त्यामुळे पुरेशा अटी घालून जामीन देणे योग्य होईल, असे उच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

Goa Crime News
54th IFFI: इफ्फीत ‘गाला प्रीमियर्स’चे आकर्षण कायम

संशयित मिनामू अफूसा हिने जानेवारी 2020 मध्ये बागा - कळंगुट येथे झेफेरिनो बार्रेटो याच्याशी झालेल्या वादातून त्याचे डोके ठेचून खून केला होता. त्यानंतर त्याच रात्री ती गेस्ट हाऊस सोडून पळाली होती. कळंगुट पोलिसांनी तिची माहिती मिळवून दुसऱ्या दिवशीच तिला अटक केली होती. तिने खुनाची कबुली दिली होती. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते.

अशा आहेत अटी

संशयित मिनामू अफूसा हिने वैयक्तिक 50 हजारांची हमी तसेच तत्सम रकमेचे हमीदार सत्र न्यायालयाच्या समाधानानुसार सादर करावेत. वैध पासपोर्ट व व्हिसा न्यायालयात सादर करावा. या पासपोर्टच्या आधारावर मिळवलेले मोबाईल सिम कार्डचा वापर करावा. पासपोर्टची नोंदणी ‘एफआरआरओ’ कार्यालयात नोंद करावी.

ती राहत असलेल्या निवासाचा पत्ता तसेच मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना द्यावा. दर सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कळंगुट पोलिस स्थानकात तसेच खटल्‍याच्या सुनावणीवेळी उपस्थिती लावावी. भारताबाहेर ती पळून जाऊ नये म्हणून लुकआऊट परिपत्रक राज्य सरकारने जारी करावे, अशा अटी घातल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com