Diwali 2025 Dainik Gomantak
गोवा

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

Diwali in Goa: दीपावली आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारात खरेदीची लगबग वाढली असून गर्दी वाढली आहे. कारीट बाजारात भाव खाऊ लागले असून २० रुपयांना अर्धा डझन दराने त्याची विक्री होऊ लागली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दीपावली आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारात खरेदीची लगबग वाढली असून गर्दी वाढली आहे.

विविध प्रकारचे मिठाईचे साहित्य, फराळासाठी लागणारे साहित्य, आकाशकंदील, पणत्या, फटाके आदी खरेदीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. दिवाळीनिमित्त लागणारे कारीट बाजारात भाव खाऊ लागले असून २० रुपयांना अर्धा डझन दराने त्याची विक्री होऊ लागली आहे.

पूर्वी सर्रासपणे सर्वत्र मिळणारी ही कारीट आता शहरी भागात मिळणे कठीण झाल्याने शहरात राहणाऱ्या नागरिकांना ती विकत घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. काहीजण कामाच्या व्यस्ततेमुळे ती विकत घेणेच पसंत करतात. पणजीतील फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यावर देखील कारीट विकली जात आहे.

बाजारात विविध प्रकारच्या मिठाईसोबतच गावठी पोहे, भुईमुगाच्या शेंगा, रताळी, काटेकणगा आदींनादेखील चांगली मागणी आहे. काटेकणगा १५० रुपये किलो वाटा, रताळी ६० रुपये किलो तर भुईमूग १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. फळभाज्यांचे दर मागील आठवड्याप्रमाणेच कायम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live Updates: मोले चेकपोस्टवर पुन्हा बेकायदेशीर गोमांस पकडले, चालक पोलिसांच्या ताब्यात

'डिचोलीत पर्यटन सर्किट उभे राहिल'! श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण सुरु; CM सावंतांची उपस्थिती

Blackbuck Death: धक्कादायक! 1 नाही 2 नाही... 28 काळविटांचा मृत्यू! राज्यात पहिल्यांदाच असा संसर्ग, वनमंत्र्यांनी दिले कठोर चौकशीचे आदेश

Canacona Water Problem: 8 दिवस पाण्याची टंचाई! ग्रामस्थांनी घातला सहाय्यक अभियंत्याला घेराव; मास्तीमळ येथे पाणीप्रश्न ऐरणीवर

Goa Accident: अनर्थ टळला! चालत्या 'कदंबा'च्या छतावर पडले स्टील बार; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT