दिवाळी उत्सवानिमित प्रियोळ मधील "रंग सृष्टी" ह्या युवापिढीच्या गटातर्फे आकाशकंदील बनविणे, मेहंदी, तसेच मेणबत्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा प्रियोळमधील हौशी आणि युवा कलाकारांनी प्रियोळ मतदारसंघ मर्यादित आयोजित केलेले असून, वयोमर्यादा 14 वर्ष वयोगटावरील मुलामुलींनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजन कर्त्यानी केले आहे. ही कार्यशाळा चार दिवस मतदारसंघातील विविध ठिकाणी आयोजित केली जाणार आहे.
22 ऑक्टोबरला सकाळी 10 ते 12 वाजता वळवई येथे ही पहिली कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 पासून ते सायंकाळी 5 वाजता तीवरे वरगाव पंचायत क्षेत्रात ही कार्यशाळा घेतली जाणार आहे.
पुढे 29 ऑक्टोबरला सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता बेतकी खांडोळा आणि दुपारी 3 ते 5 वाजता सावईवेरे पंचायत क्षेत्रात होणार आहे. 4 नोव्हेंबरला सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता भोम पंचायत क्षेत्रात कार्यशाळा होणार आहे.
शेवटची कार्यशाळा 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता वीपीके पंचायत क्षेत्रात तर दुपारी 3 ते 5 पर्यंतकेरी प्रियोळ येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
दिवाळीची रंगत वाढविणाऱ्या आकाशकंदिलाची भुरळ सर्वांनाच पडते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आकाशकंदिलांच्या आकर्षणास कुणीही अपवाद नाही. बाजारात जरी एकापेक्षा एक आकर्षक आकाशकंदील दाखल झाले असले तरीही, स्वत:च्या हाताने साकारलेल्या आकाशकंदिलाची रंगतच न्यारी.
त्याचबरोबर या कार्यशाळेत मेहंदी कशी घातली जाते, मेणबत्त्या अत्यंत सोप्या पद्धतीने कशा बनविल्या जातात तेही या कार्यशाळेच्या माध्यमातून शिकविले जाईल.
तुम्हाला जर ह्या कार्यशाळेत भाग घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर नावनोंदणी करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
९३७३८५१९२३ ७२६३९५४५८१
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.