Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Divya Rane: केरी गावाचे सुशोभीकरण, अंजुणे धरण परिसरात वेलनेस सेंटर होणार; आमदार डाॅ. राणे

Querim: वीज कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल पंचायत मंडळातर्फे आमदार दिव्या राणे यांच्या हस्ते मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: केरी गावाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आजोबाची तळी व परिसराचे सुशोभीकरण तसेच अंजुणे धरण परिसरात वेलनेस सेंटर उभारून पर्यटनदृष्ट्या विकास करणार असल्याचे प्रतिपादन पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी बुधवारी केरी-सत्तरी येथे केले.

येथील पंचायत इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सत्तरी गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, सरपंच केरी दीक्षा गावस, उपसरपंच भिवा गावस, सुप्रिया गावस, नंदिता गावस, राजेश गावस, संदीप ताटे, पंचायत सचिव गुरुनाथ केरकर तसेच मान्यवर उपस्थित होते.

आमदार राणे म्हणाल्या, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी राज्यात तसेच सत्तरीत विकासवृक्षाची लागवड केली होती. त्याला खतपाणी घालण्याचे काम आम्ही करत आहोत. साहेबांमुळेच सत्तरीच्या विकासाला चालना मिळाली. आज गावातील अनेकजण उच्च पदावर आहेत. शिक्षण असो वा उद्योग, अनेकजण पुढे येत आहेत. केरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली पाण्याची समस्या हळूहळू दूर केली जात आहे.

यावेळी गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, सरपंच दीक्षा गावस यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान

यावेळी पावसाळ्यामध्ये आपत्कालीन काळात वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल पंचायत मंडळातर्फे आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार राणे तसेच पंचायत मंडळातर्फे इमारतीच्या छतावर राष्ट्रध्वज फडकवून त्याला मानवंदना देण्यात आली.

पंचायत कामकाजाचे डिजिटलायझेशन

पंचायतीच्या माध्यमातून गावाला चांगल्या दर्जाची सेवा पुरविण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पंचायत कामकाजाचे डिजिटलायझेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या दोन वर्षांत केरीवासीयांसाठी सुसज्ज व भव्य अशी अडीच कोटी रुपयांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पंचायतीचा दर्जा वाढणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT