divya rane or jennifer monserrate for bjp ministerial post who to chooset Dainik Gomantak
गोवा

मंत्रिपदासाठी 'या' दोन महिलांमध्ये चुरस कुणाला लागणार लॉटरी

जेनिफर मंत्री बनणार का? की पर्येला महत्त्व राहणार?

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा निवडणुकीनंतर नेता निवडीचा प्रश्न कायम असताना दुसरीकडे मंत्रिपदाची चुरस वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने नव्या विधानसभेत तीन महिला निवडून आल्या आहेत. तर भाजपकडून केवळ दोन महिला विधानसभा गाजवरणार आहेत. या दोन महिलांमध्ये पर्ये मतदारसंघाच्या डॉ. दिव्या राणे व ताळगावच्या जेनिफर मोन्सेरात यांचा समावेश आहे. आता या दोघीत मंत्रिपदासाठी चुरस असल्याची चर्चा राजकीय (Politics) वर्तुळात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) 301 उमेदवारांपैकी 26 महिलांनी आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात मात्र पर्येतून डॉ. दिव्या राणे ताळगावमधून जेनिफर आणि शिवोलीतून दिलायला लोबो यांनी बाजी मारली आहे.

भाजपकडून (BJP) दोन महिलांनाच संधी मिळाल्याने आता दोघीपैकी एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान द्यावेच लागणार आहे. पण, हे दोघेही दाम्पत्य असल्याने मंत्रिमंडळात स्थान कुणाला द्यावे, हा प्रश्न भाजपला सतावू लागला आहे. कारण विश्वजित राणे आणि बाबूश मोन्सेरात या महत्त्वकांक्षी दोघाही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान हवे आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नींना मंत्रिमंडळात घेतल्यास इतर आमदारांमध्ये नाराजी वाढणार आहे. कारण पती-पत्नींना उमेदवारी देण्यावरून प्रचंड नाराजी होती. मात्र केवळ ‘जिंकण्याची क्षमता’ या निकषावर राणे आणि मोन्सेरात दाम्पत्यांनी उमेदवारी मिळवली आणि विजय खेचून आणला. आता मंत्रिपदाच्या निकषाबाबतीत कोणते निकष लावणार हा प्रश्न आहे.

जेनिफर मंत्री बनणार का?

जेनिफर मोन्सेरात या ज्येष्ठतेच्या आधारावर वरिष्ठ आहेत. त्यांनी यापूर्वी विधानसभेत आमदारकीबरोबर डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळात महत्त्वाचे महसूल, श्रम आणि कामगार ही खाती चांगल्याप्रकारे सांभाळली आहेत. त्यावेळी बाबूश मोन्सेरात आमदार (MLA) नव्हते. आता बाबूश निवडून आल्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षेत वाढ झाली आहे. या दाम्पत्यांना मंत्रिमंडळात स्थान हवे असून, तसे न झाल्यास बाबूशची नाराजी वाढणार आहे. जेनिफर यांनाही मंत्रिमंडळातील अनुभव असल्याने त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा लागून राहिली आहे.

पर्येचे महत्त्व राहणार का?

पर्ये मतदारसंघ माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा बालेकिल्ला. परंतु यंदा सिनिअर राणे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या सूनबाई डॉ. दिव्या राणे (Divya Rane) ह्या तेथून राज्यात सर्वाधिक मताने निवडून आल्या आहेत. जेनिफर वगळता त्या एकमात्र महिला आमदार असल्याने त्यांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. यापूर्वी 50 वर्षे सक्रीय राजकारणात राहण्याचा विक्रम करणाऱ्या प्रतापसिंग राणे यांनी या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त करून दिले होते. ते यापुढे राहणार का? यापुढे राहणार का यापुढे राहणार का? अशी चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT