Goa : आठवडा- बुधवारी बाजारात स्थानिक व्यवसायिक महिलांना छत्र्यांचे वाटप केरतांना कॉग्रेस सेवा दलाचे दत्ताराम पेडणेकर, सोबत जगन्नाथ गांवकर, दिगंबर आमोणकर, सनी सांळगांवकर, हर्षा सांळगांवकर व गरजुं महिला : संतोष गोवेकर. Dainik Gomantak
गोवा

उन्हाचे चटके सोसणाऱ्या व्यापारी महिलांना आता 'छत्र्यांचा आधार'

स्थानिक व्यापारी महिलांना छत्र्यांचे वाटप..

दैनिक गोमन्तक

Goa: समाजकारणाशिवाय राजकारणाला मुळीच अर्थ नसतो हे कॉग्रेसने आतापर्यंत दाखवून दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून सुरुवात केलेल्या कॉग्रेसने नंतरच राजकारणात उडी घेतल्याचे इतिहास सांगतो. शिवोली कॉग्रेस (Congress) सेवा दलाचे अध्यक्ष म्हणून काम करतांना हीच गोष्ट मला वारंवार स्फूर्ती तसेच प्रेरणा देत असल्याचे याभागातील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पेडणेकर (Dattaram Pednekar) यांनी शिवोलीत सांगितले.

मार्ना शिवोलीत पोर्तुगीज काळापासून दर बुधवारी भरणाऱ्या पारंपरिक बाजारात स्थानिक व्यापारी महिलांना छत्र्यांचे वाटप केल्यानंतर पेडणेकर बोलत होते. दरम्यान, याभागातील व्यावसायिक महिलांना उन्हांपासून थोडाफार विसावा मिळावा या हेतूने पेडणेकर यांनी बुधवारच्या बाजारात आपल्या कार्यकर्त्यासहित मोठ्या छत्र्यांचे मोफत वाटप कले यावेळी ते बोलत होते. दरम्यान, दर आठवडी भरणाऱ्या येथील बाजारात दहा ते वीस स्थानिक महिला गांवठी भाजीपाला तसेच घरगुती खाद्यपदार्थाची विक्री करत असतात. गेली कित्येक वर्षे कुठल्याही सोयी सुविधांविना या महिला पावसाळ्यात पाऊस तर उन्हांत गर्मीचे चटके सहन करीत याभागात आपला व्यवसाय करतात.

दरम्यान, स्वावलंबी गोवा बनविण्याची भाषा बोलणारे स्थानिक राजकारणी अशा महिलांसाठी आतापर्यंत निवारा शेड अथवा मुतारीची सुद्धा सोय याभागात करुं शकलेले नाहीत त्यामुळे केवळ घोषणा करून गोवा आणी गोमंतकीय स्वावलंबी होणार नाहीत असे पेडणेकर यांनी यावेळी सांगितले .

दरम्यान, नैसर्गिक विधी आटोपण्यासाठी जवळच्या जंगलाची मदत घेणाऱ्या येथील व्यापारी महिलांच्या जीवाला परप्रांतीय अपप्रव्रुत्तीच्या लोकांपासून धोका पोहोचण्याची भीती असल्याचे याभागाचा दौरा केला असतां दिसून आले. पोर्तुगीज काळापासून याभागात आपला व्यवसाय थाटणार्या महिला सध्या पंचायत आणी चर्च प्रोपर्टी यांच्या वदात अडकल्याचे दिसून आले.

दरम्यान, यावेळी स्थानिक जगन्नाथ गांवकर , ग्रेसी डिसौझा श्रीमती चोडणकर, तसेच महिला संघटणेच्या हर्षा सांळगांवकर यांची समयोचित भाषणे झाली. येत्या एकदोन दिवसांत तारची-भाट येथील स्थानिक व्यापारी महिलांना अशाच प्रकारे छत्र्यांचे वाटक करण्यात येईल असे पेडणेकर यांनी शेवटी सांगितले......

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मोले येथे ट्रक कलंडला!

Goa BJP: तानावडेंसमोर तवडकर ठाम! समजूत काढण्यासाठी आता पुढच्या आठवड्यात बैठक

Cuchelim: 'कुचेली कोमुनिदाद'बाबतीत गोवा खंडपीठ गंभीर! कारवाईचे दिले निर्देश; 'ती' 4 घरे पाडली जाणारच

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

SCROLL FOR NEXT