Goa Crime: Drug trafficking In Goa
Goa Crime: Drug trafficking In GoaDainik Gomantak

राज्यात 'अमली पदार्थ्याच्या' तस्करीचा सपाटा सुरूच..!

पोलिसांची धडक कारवाई; मूळ ओडिशाच्या युवकाला अटक
Published on

म्हापसा: पर्रा म्हापसा येथील कोमुनिदाद घराजवळ आज दुपारी इम्सची विक्री होत असल्याची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी सापळा रचून वियांती गंथिरत्न माळी (29 मूळ ओडिशा) या युवकाला अटक (Goa Crime) करून त्याच्याकडून 3 किलो 10 ग्रॅम वजनाचा आणि 3 लाख 120 रुपये किमतीचा गांजा (Drug trafficking) जप्त केला.

Goa Crime: Drug trafficking In Goa
'Amchem Goa'ची चव थेट कराचीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पर्रा कोमुनिदाद घराजवळ एक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुशांत कासार, राजेश कांदोळकर व अक्षय पाटील यांनी सापळा रचला वियांती याला अटक केली. संशयिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत उपनिरीक्षक गौरव नाईक, महिला उपनिरीक्षक विभा वळवईकर, सुशांत चोडपेकर, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, राजेश

खानोलकर यांनीही सहभाग घेतला. पोलीस उपअधीक्षक गजानंद प्रभुदेसाई आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com