Navy Dainik Gomantak
गोवा

Navy: नौदल हायर कमांड वर्गाच्या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट प्रबंधासह, जनरल बिपिन रावत ट्रॉफीचे वितरण

नेव्हल वॉर कॉलेज परिसरात पार पडला समारोप सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

Navy 35 व्या नेव्हल हायर कमांड कोर्सचा समारोप सोहळा नेव्हल वॉर कॉलेज परिसरात पार पडला. भारतीय नौदलाचे 25 अधिकारी, भारतीय लष्कर आणि वायुसेनेचे प्रत्येकी 4 अधिकारी, तटरक्षक दलाचा 1 अशा 34 अधिकाऱ्यांनी हा कोर्स पूर्ण केला.

हा फ्लॅगशिप कोर्स आहे. राष्ट्रीय सुरक्षा, सागरी रणनीती, संयुक्त मोहीम आणि तंत्रज्ञानातील परिवर्तनांवर प्राथमिक लक्ष केंद्रित करणे, त्याद्वारे धोरणात्मक आणि ऑपरेशनल स्तरावर नेतृत्वासाठी अधिकारी तयार करणे हे या कोर्सचे उद्दिष्ट आहे.

या अभ्यासक्रमादरम्यान सहभागी अधिकाऱ्यांनी राष्ट्रासाठी आणि विशेषतः सशस्त्र दलांसाठी धोरणात्मक, ऑपरेशनल महत्त्व असलेल्या विविध विषयांवर संशोधन केले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे या सोहळ्‍याला प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते.

तसेच नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल एम. ए. हंपीहोली हेही उपस्थित होते. सहभागींना ‘संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास’ या विषयावर पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी नेव्ही वेलफेअर ॲण्‍ड वेलनेस असोसिएशनच्या अध्यक्ष कला हरी कुमार, दक्षिण क्षेत्र नेव्ही वेलफेअर ॲण्‍ड वेलनेस असोसिएशनच्या अध्यक्ष मधुमती हम्पीहोली तसेच स्व. जनरल बिपिन रावत यांच्या मुली उपस्थित होत्या.

नौदल पदकांचे उत्‍साहात वितरण

कॅप्टन राजीव तिवारी यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी नौदल प्रमुख सुवर्णपदक आणि द्वितीय सर्वोत्तम प्रबंधासाठी कॅप्टन विक्रम आहुजा यांना रौप्यपदक प्रदान करण्यात आले.

कॅप्टन कुणाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट ऑपरेशन रिसर्च पेपरसाठी रौप्यपदक तर कॅप्टन वरुण पणीकर आणि कर्नल आर. आर. लड्ढा यांना दुसऱ्या उत्कृष्ट प्रबंधासाठी रौप्यपदक देण्यात आले.

मोस्ट स्पिरिटेड ऑफिसरसाठी पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या स्मरणार्थ नव्याने स्थापित जनरल बिपिन रावत ट्रॉफी कॅप्टन सूरज जेम्स राबेरा यांना प्रदान करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT