Gomantak Quiz Competition  Dainik Gomantak
गोवा

Gomantak Quiz Competition : गोमन्तक प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील दोन बंपर विजेत्यांना लॅपटॉपचे वितरण

दहा विजेत्यांना गिअर सायकल; ३० फिटनेस बॅन्ड, ५० विजेत्यांना डिनर सेट

दैनिक गोमन्तक

Gomantak Quiz Competition : ‘गोमन्तक सुपर फॅमिली प्रश्‍नमंजुषा स्पर्धा २०२२’ मधील विजेत्यांना आज संपादक-संचालक राजू नायक यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. बंपर लॅपटॉप प्रथम पारितोषिक पिसुर्ले-सत्तरी येथील तक्षम बानकर व सडा वास्को येथील विहान बांदेकर यांना प्राप्त झाले. तर प्रथम दहा विजेत्यांना गिअर सायकल, द्वितीय ३० विजेत्यांना फिटनेस बॅन्ड आणि तिसऱ्या ५० विजेत्यांना डिनर सेट पारितोषिक प्राप्त झाले.

‘गोमन्तक’ केवळ वृत्तपत्र नव्हे तर गोव्याबद्दलच्या प्रेमापोटी, आत्मियतेतून काम करणारी एक उत्कृष्ट माध्यम संस्था आहे. गोव्यातील प्रश्‍नांबाबत सतत जागृती निर्माण करणाऱ्या या माध्यमाद्वारे वाचकांना विचार मिळतात.

‘गोमन्तक’ला चळवळीचे स्वरूप देण्याचे कार्य गोमंतकीयांनी करावे, असे आवाहन संपादक-संचालक राजू नायक यांनी केले. यावेळी सहाय्यक वितरण व्यवस्थापक भारत पोवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा फडते यांनी केले.

‘गोमन्तक सुपर फॅमिली प्रश्‍नमंजुषा स्पर्धा २०२२’ मधील फिटनेस बॅण्ड विजेत्यांसोबत मान्यवर.

Gomantak Quiz Competition

आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी देखील आपल्याला गोव्याबद्दल प्रेम व आपल्या कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमध्ये वाचक सहभागी झाल्यास वृत्तपत्र आणि वाचकांना बळकटी प्राप्त होत असते. ‘गोमन्तक’ परिवारातर्फे वाचकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यापैकीच ही प्रश्‍नमंजुषा स्पर्धा आहे. यंदा देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्यांनी जीवनात आणखी यशस्वी व्हावे, ही सदिच्छा.

- राजू नायक, संपादक-संचालक, गोमन्तक

  • गिअर सायकल विजेते

प्रश्‍नमंजुषा स्पर्धेतील प्रथम दहा विजेत्यांना गिअर सायकल देण्यात आल्या. संदेश नाईक, मनोहर नाईक, रूचिरा च्यारी, दिविशा पुनाळकर, स्वानंद माणगांवकर, अमोल पार्सेकर, प्रकाश गवस, सुहम नाईक, सौरवी शिरोडकर, अन्वी रामनाथकर अशी विजेत्यांची नावे आहेत.

  • ‘गोमन्तक’मार्फत ज्ञान रुजविण्याचे कार्य

‘गोमन्तक’ हे गोवा मुक्तीनंतरचे पहिले वर्तमानपत्र आहे. सद्यस्थितीत जनतेचे विविध प्रश्‍न वृत्तपत्रातून मांडले जात आहेत. विद्यार्थी, तरुणाईच्या हातात ‘गोमन्तक’सारखे वर्तमान पत्र दिल्यास त्यांच्या मनात गोव्याविषयी प्रेम निर्माण होईल. आपल्या सभोवताली घडत असणाऱ्या विविध घटनांविषयी त्यांना माहिती मिळेल. त्यासोबतच ज्ञान रूजविण्याचे कार्य ‘गोमन्तक’ करत असल्याचे प्रतिपादन संपादक-संचालक नायक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT