CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: नवीन झुआरी पुलाच्या बांधकामावेळी मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना मदतीचे वाटप

तीन कुटूंबांना धनादेशाचे वितरण

गोमंतक ऑनलाईन टीम

CM Pramod Sawant: उत्तर गोव्याला दक्षिण गोव्याशी जोडणाऱ्या नवीन झुआरी नदीवरील नवीन पुलाचे उद्घाटन डिसेंबरमध्ये झाले. त्यानंतर आता मार्चमध्ये या पुलाच्या बांधकामावेळी मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटूंबियांना मदतीचे वाटप करण्यात आले.

या पुलाच्या बांधकामावेळी ३ कामागरांचा मृत्यू झाला होता. या तीन कामगारांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येकी दोन लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण केले.

नवीन झुआरी पुलाचे बांबोळी ते वेर्णा या टप्प्यातील काम चालू असताना 3 कामगारांचा मृत्यु झाला होता. त्या कामगारांच्या कुटुंबीयांना गोवा सरकारकडून 2 लाखांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांनी केली होती. त्यानुसार या मदतीचे वाटप राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

SCROLL FOR NEXT