Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

Goa Corona Update: गोव्यात कोरोनाच्या सक्रीय रूग्णांनी ओलांडला 100 चा आकडा, 'इतक्या' नवीन रूग्णांची भर

चाचण्यांची संख्या कमी असूनही रूग्णसंख्येत होत आहे वाढ
Published on

Goa Corona Update: एकीकडे गोव्यात H3N2 चा शिरकाव झाला असतानाच राज्यातील कोरोना रूग्णांच्यास संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे नवीन 17 रूग्ण आढळून आले आहेत.

Goa Corona Update
Vijai Sardesai: गोव्यात 'एक्स्टॉर्शन तुमच्या दारी'; विजय सरदेसाईंचा गोवा सरकारवर घणाघात

गोव्यात नव्याने आढळलेल्या या 17 नव्या रूग्णांमुळे राज्यातील सक्रिय कोरोनारूग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे. राज्यात आता 109 सक्रिय रूग्ण आहेत. या नव्या 17 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात 11 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गोव्यात गेल्या 24 तासात 170 नव्या चाचण्या झाल्या आहेत. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.41 टक्के इतका आहे.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 55 हजार 292 एकुण चाचण्या झाल्या आहेत. एकुण 2 लाख 59 हजार 297 रूग्ण आढळून आले होते, त्यातील 2 लाख 55 हजार 175 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com