Rice cutting problem  Dainik Gomantak
गोवा

Rice Harvest : काणकोण परिसरात भात कापणीत व्यत्यय

काणकोणच्या काही भागात आज दुपारी पावणे तीन ते पावणे चार वाजेपर्यंत एक तास गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Rice Harvest : काणकोण, काणकोणच्या काही भागात मंगळवारी एक तास गडगडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने भातशेती आडवी झाली. काही ठिकाणी भात कापणी चालू असताना अडथळा आला. मंगळवारी

काणकोणच्या काही भागात आज दुपारी पावणे तीन ते पावणे चार वाजेपर्यंत एक तास गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.

गावडोंगरी, खोतीगाव व अंतर्गत भागात सकाळी बारा वाजल्यापासून गडगडाटासह पाऊस पडला. त्याचा परिणाम कापणीस तयार झालेल्या भात पिकावर झाला. काही ठिकाणी उभी भातपिके आडवी झाली.

कोळंब-काणकोण येथे माडावर व वेलवाडा पैंगीण येथे पोफळीच्या झाडावर वीज पडल्याने नुकसान झाले. हा अवकाळी पाऊस मिरची पीक व बागायती पिकांना पोषक ठरणार आहे.

मात्र या अकस्मात आलेल्या पावसामुळे सकाळपासून हवेत उष्मा वाढून हैराण झालेल्या रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. या पावसामुळे काणकोणच्या किनारी भागातील पर्यटकांना त्रास झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT