Disputes over fair in Mayem Administrative attempt failed Dainik Gomantak
गोवा

मयेत जत्रेवरून वाद; प्रशासकीय प्रयत्न अयशस्वी

हजारो भक्तांचा भ्रमनिरास

दैनिक गोमन्तक

डिचोली : तीन वर्षांनी मयेतील श्री माया केळबाय देवस्थानची प्रसिद्ध ‘माल्याची जत्रा’ साजरी झाली खरी, मात्र या जत्रेतील प्रमुख वैशिष्ट्य असलेले ‘माले’ मात्र अखेरपर्यंत पेटले नाही. अधिकारावरून वाद निर्माण झाल्याने शेवटपर्यंत माले मंदिराबाहेर काढण्यात आले नाही. माले पेटले नसल्याने देवीचा ‘पण’ अपूर्ण तर राहिलाच, उलट माले नृत्याचा दैवी चमत्कार अनुभवण्यासाठी आलेल्या हजारो भक्तांचा भ्रमनिरास झाला. दुसऱ्या बाजूने काही पारंपरिक रितिरिवाजांना फाटा देत मये गावात वास्त्यव्यासाठी आलेल्या मुळगावच्या श्री केळबाई देवीची पेठचे मध्यरात्री मुळगावला प्रयाण झाले. तर आज (रविवारी) पहाटे मयेतील पेठ केळबाय देवीच्या मंदिरात नेण्यात आली.

गेल्या गुरुवारी पहाटे मयेतील (mayem) श्री केळबाय देवीची पेठ मंदिराबाहेर काढण्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र नंतर प्रशासकीय पातळीवर बैठक होवून तोडगा काढल्यानंतर जवळपास बाराहून अधिक तासांच्या प्रतीक्षेनंतर पेठ मंदिराबाहेर काढून चव्हाटा याठिकाणी नेण्यात आली.

पेठ मंदिराबाहेर काढल्याने ‘माल्याची जत्रा’ साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तीन वर्षांच्या कालखंडानंतर काल शनिवारी माल्याची जत्रा साजरी होणार असल्याने यंदा जत्रेला भाविकांचा महापूर लोटला होता.जत्रेनिमित्त शनिवारी सकाळपासूनच गावात मंगल आणि उत्साहवर्धक वातावरण पसरले होते. सकाळपासून दिवसभर विविध पारंपरिक धार्मिक विधी सुरळीतपणे पार पाडण्यात आले होते.

अधिकारावरून वाद

रात्री तरंगांसह वाजतगाजत केळबाय देवीच्या मंदिरातून ‘माले’ चव्हाटा याठिकाणी आणल्यानंतर माल्याच्या जत्रेतील प्रमुख विधी पार पाडण्यात येतात. काल रात्री माले आणतेवेळी माल्याला हात लावण्याच्या अधिकारावरून देवस्थान समिती आणि दुसऱ्या गटामध्ये वाद सुरु झाला. वाद वाढत गेल्यानंतर डिचोलीचे (Bicholim) उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर रात्रीच मये गावात दाखल झाले. कुंभारवाडा येथे त्यांनी संयुक्त बैठकही घेतली. या बैठकीवेळी आमदार प्रेमेंद्र शेट हेही उपस्थित होते. माले बाहेर काढण्यावरून निर्माण झालेला वाद मिटवाण्याचा प्रयत्नही झाला. मात्र शेवटपर्यंत ठोस तोडगा निघाला नसल्याने माले मंदिराबाहेर काढण्यात आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

SCROLL FOR NEXT