Dispute in Jama Masjid Goa Dainik Gomantak
गोवा

म्हापसा जामा मशीदची सभा बंदोबस्तात

विरोधींना प्रवेश नाकारला ; निष्कासित सदस्यांच्या याचिकेवर आज सुनावणी

दैनिक गोमन्तक

म्हापसा : आंगड-म्हापसा येथील जामा मशिदीची वार्षिक सर्वसाधारण सभा फिरोज कटवेलिया यांच्या नेतृत्त्वात रविवारी (ता.24) पोलिस संरक्षणात अखेर पार पडली. ही सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी गटाचे फिरोज खान व त्यांच्या सहकाऱ्यांना सभेत प्रवेश नाकारण्यात आला.

दरम्यान, आम्हाला निष्कासित केल्याचा दावा कमिटीवाले करतात. पण त्याबद्दल कुठलीही नोटीस मला किंवा इतरांना मिळालेली नाही. याच आमसभेविषयी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, सोमवारी (ता.25जुलै) सुनावणी आहे,असे खान यांनी सांगितले.

(Dispute in Jama Masjid Goa)

या सभेच्या स्थळी बार्देशचे मामलेदार शैलेंद्र देसाई, निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक विरोज कोरगांवकर, बाबलो परब, महिला उपनिरीक्षक विभा वळवईकर या हजर होत्या.

कमिटीचे नोंदणीकृत सदस्य असताना आम्हाला सभेत प्रवेश डावलला जातोय. सभेत सोडण्याची मागणी आम्ही पोलिसांना केली, परंतु आमचे ऐकून घेतले नाही. विद्यमान कमिटीची हुकूमशाही सुरू असून, नोंदणीकृत सदस्यांना ते हक्कांपासून वंचित ठेवत आहेत.

-फिरोज खान, विरोधी गट

याच मशिदीची सर्वसाधारण सभा दि. 19 जून रोजी होती. मात्र, त्यावेळीही याच विरोधी गटाने बेकायदेशीरपणे नवीन सदस्यांची नोंदणी करून, त्यांना सभेत प्रवेश दिल्याचा दावा करून गोंधळ घातलेला होता. त्यामुळे ती सभा बरखास्त करावी लागली होती. ती ता.२४ जुलैला पोलिस संरक्षणात पार पडली.

- फिरोज कवटेलिया, अध्यक्ष जामा मशीद

11 सप्टेंबरला निवडणूक

जामा मशिदीचे अध्यक्ष फिरोज कटवेलिया म्हणाले, आजची सर्वसाधरण सभा पोलिस संरक्षणात शांततेत पार पडली. ज्या सदस्यांना निष्कासित केले होते, त्यांना सभेत प्रवेश दिला नाही. जामा मशिदीच्या व्यवस्थापन कमिटीसाठी 11 सप्टेंबर रोजी निवडणूक होईल. त्यासाठी पाच सदस्यीय समिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

SCROLL FOR NEXT