Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: भंडारी समाजामध्ये नव्या संघटनेसाठी हालचाली? लवकरच घोषणा होण्याची शक्यता..

Goa Bhandari Samaj: राज्यातील इतर मागासवर्गीयांतील सर्वांत मोठा भंडारी समाज आता फुटीच्या उंबरठ्यावर पोचला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Bhandari Samaj

पणजी: राज्यातील इतर मागासवर्गीयांतील सर्वांत मोठा भंडारी समाज आता फुटीच्या उंबरठ्यावर पोचला आहे. सध्या या समाजाची गोमंतक भंडारी समाज ही एकमेव संघटना असून तिला समांतर अशी दुसरी संघटना स्थापन कऱण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात त्याविषयीची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. दुसरीकडे गोमंतक भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी ६ ऑक्टोबर रोजी वास्को येथे समाजाची आमसभा बोलावली आहे.

समाजाच्या अध्यक्षपदी अनिल होबळे असताना त्यांच्या पॅनलविरोधात अशोक यांच्या पॅनेलने निवडणूक लढविली. त्यात होबळे यांच्या गटाचे उपेंद्र गावकर हे एकमेव उमेदवार निवडून आले. सभासदांपेक्षा मतदान जास्त कसे झाले, या मुद्यावर होबळे यांनी निवडणुकीस आक्षेप घेतला. ते नंतर न्यायालयातही गेले आहेत.

अशोक यांच्या गटाकडे होबळे यांनी ताबा न देताच त्यांनी कारभार सुरू केल्याने विरोधकांकडून ती समिती बेकायदा असल्याचा वारंवार पुनरुच्चार करण्यात येत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या मुदतवाढीसही आक्षेप आहे.

नाईकांच्या वाढदिनी काय नाट्य घडले?

मंत्री रवी नाईक यांच्या वाढदिनी अशोक हे समितीच्या पाच सदस्यांसह त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.

त्यावेळी राजकीय आरक्षण ओबीसींना का नाही, हा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी नाईक यांनी, मला मंत्रालयात भेटायला या, असा निरोप दिला.

त्‍यानुसार महादेव नाईक, दिलीप परूळेकर, दयानंद मांद्रेकर यांच्यासह किरण कांदोळकर, जयेश साळगावकर, नरहरी हळदणकर, लवू मामलेदार, उल्हास अस्नोडकर रवी नाईक यांच्याकडे पोचले, तेव्हा अशोक नाईक समितीसह तेथे आले.

तेथे संजीव नाईक आणि इतरांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. प्रकरण एवढे वाढले की, रवी नाईक यांनी आपल्यासोबत छायाचित्रही नको, अशी भूमिका घेतली.

अखेर माजी मंत्री मांद्रेकर यांच्या हस्ते निवेदन देऊन विषय मिटविण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT