Sanvordem Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Sanvordem : सावर्डे ग्रामसभेत प्रकरण हातघाईवर; पोलिसांच्या हस्तक्षेपाने सभा तहकूब

गृह निर्माण प्रकल्पावरुन दोन गटात तणाव वाढला

दैनिक गोमन्तक

सावर्डेमध्ये आज ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत विविध प्रश्नावर चर्चा झाली,  यातील मुख्य मुद्दे म्हणजे गार्बेज मॅनेजमेंट फॅसिलिटी व ग्रहनिर्माण प्रकल्प विषयावर बागवाडा स्थानिकांनी गदारोळ केला. त्यावेळी पंचायतमधील सर्व पंच उपस्थित होते. पार्श्वभूमीवर आज सावर्डे ग्रामपंचायतीची पहिलीच ग्रामसभा चांगलीच गाजली

(Dispute between two groups at Sanvordem gramsabha)

आज पार पडलेल्या ग्रामसभेत विविध प्रश्नावर चर्चा झाली,  मुख्य मुद्दे म्हणजे गार्बेज मॅनेजमेंट फॅसिलिटी व गृहनिर्माण प्रकल्प विषयावर बागवाडा स्थानिकांनी गदारोळ केला. त्यावेळी पंचायत मधील सर्व पंच उपस्थित होते. गोमंतक टीव्हीने दाखवलेल्या गार्बेज मॅनेजमेंट फॅसिलिटी प्लांटचा अजूनपर्यंत उपयोग झाला नाही व ते तसेच पडून असल्याने लोकांनी त्याच्यावर प्रश्न विचारत हा प्रकल्प कशासाठी आणला होता व त्याचा उपयोग का करत नाही असे प्रश्न विचारले सरपंच व बाकी पंचांना धारेवर ठेवले.

सावर्डे ग्रामपंचायतीने बोलविलेल्या ग्रामपंचायत सभेत वादंग उडाला असून प्रकरण हातघाईपर्यंत आले होते. इतक्यात प्रसंगावधान राखत कुडचडे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांवर नियंत्रण मिळवले. यामूळे काही वेळातच तणावपुर्ण वातावरण निवळण्यास मदत झाली.

दुसरा मुद्दा असा होता तो एका जमिनीचा असल्याने त्या त्या मुद्द्यावर बागवान स्थानिकांनी एकदम आक्रोश दाखवत गदारोळ केला, हा गदारोळ एका वादग्रस्त  जमिनीवर येणाऱ्या प्रकल्पामुळे  करण्यात आला सावर्डे येथील बाग वाडा येथील  लोकांनी 89/1A ही जमीन एका जमीनदाराने दुसऱ्या जमीनदाराला विकून तिथे मोठा प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे सांगत आपला विरोध दर्शवला.

स्थानिकांनी बोलताना या  जमिनीच्या असामी असलेल्या 89/10 आणि 89/9 जमिनीमधून लोक मुख्य रस्ता म्हणून उपयोग करतात आणि प्रोजेक्टमध्ये हा रस्ता दर्शविला  नाही  तसेच या जमिनीवर देवाचे  कृती कार्य चालतात, या कृती कार्यासाठी पण तिथे तरतूद नसल्याचे लोकांनी सांगितले, याच्या आधी त्यांना याच्याबद्दल कोणीच आवडलं नव्हतं किंवा त्याचा विरोध केला नव्हता असेही त्यांनी सांगितले.

तसेच हा प्रकल्प आला तर त्यांना पाण्याची समस्येला पण सामोरे जावे लागणार असल्याची भीती  लोकांनी व्यक्त केली. लोक जी त्यांची मागणी आहे ती म्हणजे देवाची जागा व रस्ता सोडून,मोठा प्रकल्प मोठी इमारत उभी न करता त्या जागेचा उपयोग केला तर त्यांचा कुठलाही विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी हा गोंधळ बघत सर्व पंचानी या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल तसेच याच्यावर चर्चा केली जाईल असे सांगत ग्रामसभा थांबवली व बाकीचे जे मुद्दे चर्चेमध्ये आणायचे होते ते  स्थगित केले 

जमीनदाराने आपली बाजू मांडत ही जमीन प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे व त्याच्यावर पंचायत काही निर्णय घेऊ शकत नाही असे म्हटले व  याचे निर्णय कोर्ट करणार असेही सांगितले. या ग्रामसभेत गोंधळ होणार याची या शंका व्यक्त करत आधी पोलिसांची व्यवस्था करण्यात आली होती. जेव्हा गोंधळ झाला तेव्हा पोलिसांनी मध्ये येऊन हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT