Goa Congress Loksabha Candidate Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Loksabha Candidate: काँग्रेस पक्षातील उमेदवारांच्या नावांवर आज चर्चा

Goa Congress Loksabha Candidate: काँग्रेस पक्षाच्या आतापर्यंत ज्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत, त्यात गोव्याच्या उमेदवारांचा समावेश नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Congress Loksabha Candidate

काँग्रेस पक्षाच्या आतापर्यंत ज्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत, त्यात गोव्याच्या उमेदवारांचा समावेश नाही. काँग्रेसकडून पहिल्या दोन टप्प्यांतील होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

उद्या, बुधवारी गोव्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. रात्री उशिरापर्यंत अन्यथा गुरुवारी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे जाहीर होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बैठका दिल्लीत दररोज पार पडत आहेत. उमेदवारांच्या नावावर चर्चा होऊन ती निश्‍चित केली जात आहेत.

भाजपने गोव्यातील दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे उमेदवार कोण असणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातून उद्योजक पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार देणे काँग्रेसला क्रमप्राप्त आहे.

खऱ्या अर्थाने काँग्रेस दक्षिण गोव्यातील भाजपचा उमेदवार कोण राहणार, याकडे लक्ष ठेवून होती. आता दोन्ही नावे जाहीर झाल्यामुळे काँग्रेसही आपली उमेदवारांची नावे जाहीर करतील. सध्या उत्तर गोव्यात रमाकांत खलप यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. तेच चांगली लढत देतील, असा प्रवाह आहे.

तर दक्षिणेत फ्रान्सिस सार्दिन, विरिएतो फर्नांडिस यांचे नाव सुरवातीला घेतले जात होते; परंतु आता युरी आलेमाव आणि गिरीश चोडणकर यांचे नाव चर्चेत आहे. सीईसी बुधवारी गोव्यातील उमेदवारांवर चर्चा करणार आहे. रात्री उशिरापर्यंत गोव्यातील नावे जाहीर होतील, उद्या नावे जाहीर झाली नाहीत, तर गुरुवारी ती जाहीर केली जातील, असे संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू, सहा दिवसांसाठी मुख्यमंत्री ते गोव्याच्या राजकारणाचे 'कर्णधार'; 'रवी नाईक' यांची अनोखी कहाणी!

Viral Video: डोनाल्ड ट्रम्प माझे पप्पा...! राखी सावंतचा ट्रम्प कनेक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ, नेटकरी म्हणाले, "अमेरिकेची पुढची प्रेसिडेंट राखी ट्रम्प"

अरे हिरो...! रोहित शर्मा नवीन कर्णधार शुभमन गिलला पहिल्या भेटीत काय म्हणाला? विराट कोहलीला गाडीत बसलेलं पाहिलं अन्... Video Viral

Davorlim Panchayat: ''भाजपचं गलिच्छ राजकारण चाललंय'', शेवटच्या क्षणी पंचायत निवडणूक रद्द! दवर्ली पंचायतीत हाय व्होल्टेज ड्रामा

Viral Video: पॉईंट ब्लँकवरुन आठ लोकांना भर चौकात घातल्या गोळ्या; हमासच्या क्रूर कृत्याचा व्हिडिओ समोर Watch

SCROLL FOR NEXT