Pallavi Dhempe Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून पल्लवी धेंपेंच्या नावाची औपचारिकता

Goa Politics: उमेदवारीवर मोहोर दिल्लीत घेतले भाजपचे प्राथमिक सदस्यत्व

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून उद्योजक पल्लवी धेंपे यांची भाजपने उमेदवारी जाहीर करणे आता केवळ औपचारिकता राहिली आहे. त्या उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी महिलेच्या नावाचा विचार करावा,

अशी सूचना केल्यानंतर प्रदेश पातळीवरून त्यांच्या नावाचा विचार झाला होता. त्यांनी दिल्ली येथे जाऊन भाजपचे प्राथमिक सदस्यत्व घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. भाजपने सुरवातीला या उमेदवारीसाठी माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक यांच्या नावांचा विचार चालविला होता.

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हेही उमेदवारीसाठी इच्छुक होते, तर मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर यांनी निवडणूक लोकसभा निवडणूक लढविण्यात आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून या उमेदवारीसाठी महिलेच्या नावाचा विचार करण्यात आला होता.

सुरवातीला शेफाली वैद्य यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांच्यापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्या नावांची चर्चा या उमेदवारीसाठी सुरू झाली होती.

काँग्रेसच्या चौथ्या यादीतही गोवा नाहीच

काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची चौथी यादी शनिवारी जाहीर केली. मात्र, या यादीतही गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे नमूद केली नव्हती.

पल्लवी निकषाला पात्र

दक्षिण गोव्यात नवा चेहरा हवा, शक्यतो राजकीय वर्तुळातील नको, कोणताही वाद नको, भाजपच्या विचारधारेशी जवळीक असणारे घराणे असावे, यावर भाजपचे पक्षश्रेष्ठी ठाम होते. या निकषात पल्लवी धेंपे या बसत असल्याने त्यांच्या नावाचा विचार करण्याचे ठरविण्यात आले, अशी माहिती मिळाली.

माहेरचे कनेक्शन :

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखऱ यांनी गेली दोन वर्षे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक कामाचा आढावा घेतला होता. त्यांच्या अहवालात ॲड. नरेंद्र सावईकर किंवा दामू नाईक यांना उमेदवारी दिल्यास भाजप ही जागा जिंकण्याची शक्यता कमी असल्याचे नमूद केले होते.

त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिण गोव्यात राजकीय सर्वेक्षण करून घेतले. त्यावेळी नवा चेहरा रिंगणात उतरविल्यास फायदा होऊ शकतो, असा विचार पुढे आला. त्याचवेळी धेंपे घराण्याचे दक्षिण गोव्याशी असलेले नाते आणि खुद्द पल्लवी यांचे मडगाव येथे असलेले माहेर यांचा विचार प्रामुख्याने करण्यात आला.

अनेक परोपकारी, तसेच शैक्षणिक उपक्रम

‘धेंपो हाऊस’च्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, पल्लवी या अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत आणि त्या विविध परोपकारी उपक्रमांव्यतिरिक्त अनेक शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांशी संबंधित आहेत. त्या सध्या धेंपो उद्योगाच्या कार्यकारी संचालक आहेत.

‘एक्स’वर परिचय

पल्लवी धेंपे यांनी ‘एक्स’ (पूर्वीच्या ‘ट्विटर’वर) आपल्या परिचयात लिहिल्याप्रमाणे, त्या धेंपो उद्योगाच्या संचालक आहेत. त्यांना शिक्षण, फिटनेस, वस्त्रे, प्रवास, निसर्ग, कला, कृषी आणि नृत्यात रस असून स्वयंपाकाची आवड आहे, असेही नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

SCROLL FOR NEXT