Dainik Gomantak: जनमनाचा आरसा, जनसौख्याचा वारसा @ 62

Dainik Gomantak: ‘साठी’नंतर माणूस अनुभवाने, कर्तृत्वाने प्रगल्भ होतो. पुढच्या पिढीला घडविण्याची अर्हता, पात्रता निर्माण होते.
Dainik Gomantak
Dainik GomantakDainik Gomantak

Dainik Gomantak:

‘साठी’नंतर माणूस अनुभवाने, कर्तृत्वाने प्रगल्भ होतो. पुढच्या पिढीला घडविण्याची अर्हता, पात्रता निर्माण होते. तसेच एखादे वर्तमानपत्र ‘साठी’ ओलांडते, तेव्हा ते वृद्ध नव्हे, तर सिद्ध झालेले असते. ‘साठी’ हा वयासाठीचा शब्दच ‘कुणाच्यातरी साठी’ हाच अर्थ ध्वनित करतो.

भारतकार गोविंद पुंडलिक हेगडे देसाई, तसेच बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. मुक्त गोव्यातील ‘गोमन्तक’ हे पहिले दैनिक. 24 मार्च 1962 रोजी उदयास आलेल्या या वृत्तपत्रास आज 62 वर्षे पूर्ण होत आहेत.

गोमंत भूमीत वृत्तपत्राद्वारे आधुनिक पत्रकारितेचा पाया ‘गोमन्‍तक’चे पहिले संपादक (स्‍व.) बा. द. सातोस्कर यांनी रोवला. त्‍यांनाही आजच्‍या दिनी अभिवादन! ‘वृत्तपत्र’ या शब्दात मुख्य शब्द ‘वृत्त’ असा असला तरी केवळ एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही. वृत्तपत्रे ही वाचकांच्या जीवनाशी, विचारांशी, ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा, प्रश्न, अन्याय, अभिमान, आनंद आणि दुःख अशा वेगवेगळ्या भाव-भावनांशी समरस झालेली असतात.

Dainik Gomantak
Goa Police: दारुची तस्‍करी रोखण्‍यासाठी पोळे चेक नाक्‍यावर कडक पोलीस गस्‍त

पत्रकारितेवर अनेक मर्यादा येत असूनही ‘गोमन्तक’ने तत्त्वांशी तडजोड न करता आपली वाटचाल अविरतपणे सुरू ठेवली आहे आणि त्‍याचा आम्‍हाला सार्थ अभिमान आहे.

‘ऱ्हस्व ते दीर्घ’ प्रवास आता बासष्‍ठ वर्षांचा झाला असला, तरी इथे सवलती मिळत नाहीत तर आवाका आणि जबाबदारी वाढते. तसेच ती पेलण्याची हिंमत आणि इच्छा ही ‘गोमन्‍तक’च्‍या रथाची दोन चाके आहेत. क्रांती-उत्क्रांती होते, तसे आपल्यात सकारात्मक बदल करणे शहाणपणाचे असते. ‘गोमन्‍तक’ने काळाची पावले ओळखून सीमा ओलांडली. त्‍यानंतर ‘गोमन्तक’च्या देदीप्यमान प्रवासात तीन वर्षांपूर्वी आणखी एक सकारात्मक वळण आले आणि नव्या नेतृत्वाखाली जागतिकीकरणाच्या प्रवाहात दैनिकाला नवे आयाम लाभले.

Dainik Gomantak
Holi 2024: सेंद्रीय होळींच्या रंगांना प्रोत्साहन द्या

अपप्रवृत्तींपासून गोमंतभूमीचे रक्षण आणि गोमंतकीयांच्‍या सकल प्रगतीचे ध्‍येय उरी बाळगून तरुण पत्रकारांची टीम उभी राहिली. मुद्रित माध्यमासह डिजिटल आणि टीव्हीच्या माध्यमातून ‘गोमन्तक’ हे नाव आज घराघरांत परवलीचे बनले आहे.

कठोर, वस्तुनिष्ठ तत्त्वांवर बेतलेले कृतिशील मापदंड व त्‍या जोरावर अन्यायाविरुद्ध आमचा सातत्याने संघर्ष सुरू राहिला आहे. या प्रवासात व्यवस्थापनाकडून लाभलेली कौतुकाची थाप आणि मायबाप वाचकांचे उदंड प्रेम अधिक बळ देणारे ठरले. भविष्यातही जनमनाचा आरसा आणि जनसौख्याचा वारसा, हाच ध्यास जपून निर्भीड पत्रकारितेचे व्रत सुरू ठेवू!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com