Pramod Sawant|Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Drivers Protest: मुख्यमंत्र्यांशी चर्चेतून तोडगा नाहीच; विरोधी पक्षनेत्यांचा मात्र टॅक्सीधारकांना पाठिंबा

Goa Taxi Drivers: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासमक्ष आंदोलकांच्या १६ प्रतिनिधींशी रात्री सव्वाआठ ते पावणेदहा दीड तास चर्चा केली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi Operators Protest

पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी केलेल्या मागण्यांवर आता सरकार सोमवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता मंत्रालयातील बैठकीत निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तसे लेखी पत्र आंदोलकांना देऊनही त्यांचे आज रात्री समाधान झालेले नव्हते.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाहून रात्री १०.२० वाजता निघताना या आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवर आम्ही खूश नाही, समाधानी नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय मध्यरात्री पेडण्यातील बैठकीत घेतला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासमक्ष आंदोलकांच्या १६ प्रतिनिधींशी रात्री सव्वाआठ ते पावणेदहा दीड तास चर्चा केली. त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने रात्री पावणेदहा वाजता मुख्यमंत्री घरी निघून गेले.

त्यानंतर आर्लेकर व आंदोलक यांच्यात चर्चा होत राहिली. आर्लेकर यांनी सव्वादहा वाजता पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारी यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. काही विषय हे सरकारशी नव्हे, तर जीएमआर कंपनीशी संबंधित असल्याने त्यांना या बैठकीसाठी बोलवावे लागणार आहे.

त्याआधी मुख्यमंत्र्यांनी ॲप आधारीत टॅक्सीसेवा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, सोमवारी बैठक घेतो आणि प्रश्न सोडवतो, असे आश्वासन मी दिले आहे. त्यांना आंदोलन मागे घेण्याचेही आवाहन मी केले आहे. काही गैरसमजुतीतून पुढे आलेले विषय आहेत. ते चर्चेतून सोडवता येतील. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी पर्वरी, पणजीत चर्चेची तयारी दर्शविली. त्यानुसार २५ जणांचे शिष्टमंडळ दाखल झाले. मात्र, केवळ १० जणांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करून त्यांच्याशी चर्चेस नकार दिला. त्यामुळे संताप व्यक्त करून हे शिष्टमंडळ पेडण्याला परतले होते. त्यानंतर आमदार आर्लेकर यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ मिळविली आणि रात्री ही बैठक झाली. पेडण्यातून आलेल्या शिष्टमंडळात रामा वारंग, निखिल महाले, दिलखूश मळीक, अभिषेक तोरस्कर, साहिल मळीक, समील महाले, आनंद गावस यांचा समावेश होता. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी विमानतळावर काऊंटर हवा, पार्किंग शुल्क कमी करावे, विमानतळावर भाड्याने दिल्या जाणाऱ्या खासगी वाहनमालकांवर कारवाई करावी, ॲप टॅक्सींचे विमानतळावरील काऊंटर बंद करावे, महामार्ग ते विमानतळ या रस्त्याचा टोल रद्द करावा, टोल रस्ता होण्याआधीचा रस्ता खुला ठेवावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेत्यांचा टॅक्सीधारक आंदोलकांना पाठिंबा

टॅक्सी हा स्थानिक लोकांचा व्यवसाय आहे. मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन आंदोलकांशी चर्चा करून समस्या सोडविणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. तुमचे हे ऐक्य कायम ठेवून लढा द्या. तुमचा विजय निश्‍चित आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टॅक्सी व्यावसायिकांचे मनोबल उंचावले.

पेडणे येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वेंझी व्हिएगस, गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, ॲड. जितेंद्र गावकर, पेडणे कॉंग्रेस अध्यक्ष कृष्णा नाईक, मांद्रेचे कॉंग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर, उपाध्यक्ष अजित परब, मिंगेल फर्नांडिस उपस्थित होते.

आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित

आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनीच पेडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदतही त्यांनी दिली होती. दुपारी आणखीन अर्ध्या तासाने ती वाढवण्यात आली. मात्र, दिल्ली दौऱ्यावरून परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप करत काही जणांना आमदार व्हायचे आहे, असा टोला लगावला.

विधानसभेत काँग्रेसचे ११ आमदार निवडून आले होते. त्यापैकी आठजण जरी दुसऱ्या पक्षात गेले, तरी पेडणे मतदारसंघातील जनता काँग्रेसच्याच मागे आहे. जर टॅक्सीधारकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर जनतेच्या साहाय्याने आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडू.
अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस
‘फोडा आणि राज्य करा’ ही भाजपची राज्य करण्याची पद्धत आहे. गोव्यातील सर्व टॅक्सीधारकांनी एकत्र येऊन हे आंदोलन केले. हे ऐक्य असेच कायम ठेवून सरकारला तुमच्या पायाकडे आणा. आपोआप तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील.
वेंझी व्हिएगस, आमदार, बाणावली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT