श्री मल्लिकार्जुन देवस्थान Dainik Gomantak
गोवा

देवस्थान समिती निवडीत काणकोणबाबत दुजाभाव

राजेंद्र देसाई: निवडणूक 23 मार्चनंतर घेण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

आगोंद: राज्यातील देवस्थान समितीच्या निवडीबाबत प्रशासन श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानासंदर्भात दुजाभाव करत आहे,असा आरोप देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी केला आहे. संबंधितांनी या संबंधी खुलासा करावा,अशी मागणीही त्यांनी केली.

राज्य प्रशासनातर्फे राज्यातील देवस्थान समितीची दि. 13 मार्च रोजी होऊ घातलेली देवस्थान समितीची निवडणूक काणकोण महालात अवतार पुरुषाच्या उत्सवामुळे महाजनांना अडचणीची ठरणार असल्यामुळे दि.23 मार्च नंतर किंवा 8 मार्चपूर्वी घ्यावी, असे निवेदन देवस्थान समितीने देवस्थानचे प्रशासक तथा कोणकोणच्या मामलेदारांना सादर केले होते. यासंबंधीचा निर्णय अजून देवस्थान समितीला प्राप्त झालेला नाही.

श्री मल्लिकार्जुन देवस्थान श्रीस्थळ, काणकोण देवस्थानशी संलग्न श्री देव अवतार पुरुष देवाचा वार्षिक देवविधी, अवतार, उत्सव व जत्रोत्सव 9 ते 23 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनीशी साजरा होणार आहे. या उत्सवातदेवस्थानच्या सर्व महाजनांचा प्रत्यक्ष सहभाग अपेक्षित असतो. या कारणास्तव दि. 13 मार्च रोजी, नियोजित देवस्थान समितीच्या निवडणुकीत भाग घेणे महाजनांना अडचणीचे होणार असल्याचे महाजनांनी देवस्थान समितीला कळवले होते.कवळे फोंडा येथील देवस्थानला त्यांच्या अडचणींमुळे दि.20 मार्च रोजी समिती निवडणूक घेण्यास मुभा असेल तर काणकोण, श्रीस्थळ देवस्थानही तडजोड करून दि. 20 रोजी निवडणूक घेण्यास तयार आहे. मात्र 13 मार्च ही तारीख सोयीची नाही,असे देवस्थानचे सचिव अमर शाबा देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Rashi Bhavishya 07 August 2025: नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील, घरातील वादविवाद मिटण्याची शक्यता; एखादी शुभवार्ता मिळेल

Goa Police: गोवा पोलिसांच्या ताफ्यात पाच नवीन पीसीआर व्हॅन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

SCROLL FOR NEXT