subhash faldesai Dainik Gomantak
गोवा

नदी परिवहन खात्यामध्ये शिस्त आवश्यक - मंत्री फळदेसाई

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सध्या नदी परिवहन खात्याचा अभ्यास सुरू आहे. जास्तीत जास्त सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेली फेरीबोट सेवा सुरू करण्याचा माझा विचार आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जलमार्गाचा कितपत उपयोग होईल यावर विचार सुरू आहे, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.ते मडगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. (Discipline required in river transport department - Minister Phaladesai )

यावेळी बोलताना मंत्री फळदेसाई म्हणाले की, फेरीसेवा सुरु करताना ती पर्यावरणपूरक कशी करता येईल, याबाबत आपण गांभिर्याने विचार करत आहोत. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत या सेवा अधिक सक्रियरित्या कशा प्रकारे करता येतील. याचा ही विचार आपण करत असल्याचं ही ते यावेळी फळदेसाई म्हणाले.

नव्या बदलांसाठी सर्वप्रथम नदी परिवहन खात्यामध्ये शिस्त आणणे गरजेचे असून काही कर्मचारी शिस्त पाळताना दिसत नाहीत. जाणीवपुर्वक कामचूकारपणा करत असल्याचं ही निदर्शनास आल्याचं ही ते म्हणाले अशा कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्याचा माझा निर्धार आहे. या खात्याच्या खर्चातही कपात केली जाईल, असे ते म्हणाले.

150 पैकी 130 कर्मचारी रजेवर

सध्या या खात्यातील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नाही. नदी परिवहन खात्याच्या कार्यालयातील 150 पैकी 130 कर्मचारी सुटीवरच असतात. अर्ज न करताच ते रजा घेतात. जे नियमित कचेरीत येत नाहीत किंवा कामचुकारपणा करतात, त्यांच्यावरही लक्ष ठेवण्याचा आदेश खात्याच्या प्रमुखांना दिला आहे. जे वरचेवर रजेवर असतात त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून रक्कम वजा केली जाईल. जे शिस्त पाळत नसतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही मंत्री फळदेसाई यांनी यावेळी दिला.

पणजी-वास्को फेरीबोट सेवा ही प्रतिक्षेत

पणजी वास्को दरम्यानच्या रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पणजी-वास्को दरम्यान फेरीबोट सेवा सुरू करणार आहे. याबाबत नदी परिवहन खाते विचार करत आहे. यासाठी लागणारे मोठ्या बार्जची माहिती मिळवण्यात येत आहे. गरज पडल्यास यासाठी लवकरच निविदा काढण्यात येई, अशी माहिती समाज कल्याण आणि नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली होती. यावेळी फळदेसाई पुढे म्हणाले होते की, दिवसेंदिवस रस्त्यांवरच्या वाहतुकीचा ताण वाढत आहे यासाठी जलमार्ग वाहतूक ही अत्यंत स्वस्त दराची सुविधा आहे. त्याचा लाभ पर्यटकांबरोबरच इतरांनाही होऊ शकेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT