Sanjay School Porvorim Dainik Gomantak
गोवा

Sanjay School: दुसऱ्या मजल्यावरून पडून दिव्यांग तरुण गंभीर; संजय स्कूलच्या जुन्या इमारतीतील प्रकार

इमारत दिव्यांगस्नेही नसल्याचा पालकांचा आरोप

दैनिक गोमन्तक

Sanjay School Porvorim: पर्वरी येथील दिव्यांगांसाठी असलेल्या जुन्या संजय स्कूल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून सिडनी डिसोझा हा दिव्यांग तरुण पडून गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तो बेशुद्धावस्थेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अपघाती गुन्हा नोंदवला आहे.

ही घटना आज (बुधवारी) सकाळी १० वाजता घडली. या घटनेमुळे या इमारतीमध्ये दिव्यांगांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिव्यांगांच्या पालकांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिली असली तरी त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय स्कूलमध्ये शिकणारा हळदोणे येथील दिव्यांग सिडनी डिसोझा (वय ४० वर्षे) हा आपल्या आईसोबत पर्वरी येथील जुन्या संजय स्कूल इमारतीत असलेल्या आधार कार्ड सेवा केंद्रात स्वत:चे कार्ड बनवण्यासाठी गेला होता.

तेथे तो दुसऱ्या मजल्यावरील व्हरांड्यात असलेल्या लोखंडी रेलींग्सला टेकून उभा होता. त्यावेळी हे रेलींग मोडल्याने त्याचा तोल जाऊन खाली पडला. त्यामुळे त्याच्या कंबरेच्या हाडाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला लगेच गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून अजूनही तो शुद्धीवर आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून दखल नाहीच

या घटनेनंतर संजय स्कूलमधील दिव्यांग मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन या जुन्या असुरक्षित संजय स्कूल इमारतीबाबत तसेच घडलेल्या घटनेची माहितीही दिली. मात्र, त्यांनी तत्परतेने काहीच हालचाल न केल्याचा दावा करत काही पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT