Goa Congress: लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र काँग्रेस पक्षात सर्व काही आलबेल आहे अशी स्थिती नाही. या पक्षाच्या नेत्यांची तोंडे अजूनही वेगवेगळ्या दिशेला आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातून काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केलेले एल्विस गोम्स यांनी राज्यातील काँग्रेस पक्षात जे चालले आहे ते ठीक नाही असे सांगून नेत्यांना चांगलीच चपराक दिली आहे.
वास्तविक निवडणूक तोंडावर आल्यावर तरी सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करण्याची गरज आहे. मात्र गोवा प्रदेश समितीत अजूनही ही एकजूट दिसत नाही. उलट पक्षात काहींविरोधात कारस्थाने रचणे सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी मडगावात झालेल्या छाननी समितीच्या बैठकीला मला जे आमंत्रण दिले नाही, त्यामागेही असेच षडयंत्र होते, असा आरोप एल्विस यांनी केला.
छाननी समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उभे रहाण्याची इच्छा व्यक्त केलेल्या सर्व संभाव्य उमेदवारांना बोलावले होते.
मात्र एल्विस यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आता काँग्रेस समितीने निवडणुकीसाठी जे कोण इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज करावेत असे निवेदन दिले आहे.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मी इच्छा दर्शवली होती. परंतु स्थानिक नेतृत्वाने मला छाननी समितीच्या बैठकीला बोलावलेच नाही. हा मुद्दा जिल्हा समितीच्या बैठकीत पुढे आला आणि त्यावर मोठा वादही झाला.- एल्विस गोम्स, काँग्रेस नेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.