माशेल कदंब बसस्थानकावर दीपोत्सव Dainik Gomantak
गोवा

माशेल कदंब बसस्थानकावर दीपोत्सव

दैनिक गोमन्तक

खांडोळा: डिस्कव्हरी विनोती` व `मायबोली` संस्थेतर्फे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात रविवारी आकाशकंदील व रांगोळी निर्मितीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज सकाळी 9 वा. पासून आकाशकंदील बनविण्यात कलाकार दंग होते. विविध प्रकारचे आकाशकंदील तयार करण्यासाठी स्थानिक युवक, युवती, छोटी मुलेसुद्धा सहभागी झाल होती. पर्यावरण पूरक आकाशकंदील करण्याकडे अनेकांचा कल होता. राज्यात सगळीकडे नव्याचा सण, उत्सव उत्सव साजरा केला जात आहे. ताग, कपडा, पेपर अशा साहित्याचा वापर करून विविध आकाशकंदील तयार करण्यात आले.

भाताची मळणी, कापणी सुरू आहे. अशा काळात शेतातील भाताची कणसं, भात घेऊन घेऊन आकाशकंदीलही काहींनी तयार केला. एक प्रकारे दीपोत्सवात अशा प्रकारचा आकाशकंदील तयार करून नव्या धान्याची एक आगळी वेगळ्या पूजेची तयारी केली. अशा पर्यावरणपूरक आकाशकंदीलाद्वारे दीपोत्सव करणे म्हणजे पारंपरिकता जपताना निसर्ग पूजनही होत आहे, असे मत डिस्कव्हरी विनोतीचे संतोष तारी यांनी व्यक्त केले.

बांबूपासून अनेक प्रकारेच उपयोगी साहित्य तयार केले जाते, पण या स्पर्धेसाठी सुंदरपद्धतीने आकाश कंदील करण्यात आला. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धेतही स्थानिक महिलांचे कौशल्य जाणवले, असे मत मायबोलीचे अभिजित सुर्वे, प्रताप वळवईकर यांनी व्यक्त केले. आकाशकंदील स्पर्धेत नाताशा शिरोडकर, त्रिशा फडते, साहिल नार्वेकर, विशाल माने, दिव्या फुलारी, अशिष नार्वेकर, ह्रषिकेश म्हार्दोळकर, लक्ष्मीकांत नार्वेकर, डॉ. चेतना परब, राहुल तारी, परिंदा गावकर व इतरांनी भाग घेतला. रिया शेट, अर्चना नाईक यांनीही खास रांगोळी सजावट केली होती, त्यांनी खूपच आकर्षक पद्धतीने रांगोळी रेखाटली होती. कडकडे यांचे आज गायन‘ डिस्कव्हरी विनोती अंतरा’तर्फे कदंब बसस्थानकावरील सभागृहात आज संध्याकाळी 7 वाजता अजित कडकडे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT