Goa Congress | Goa Political News Update|  Dainik Gomantak
गोवा

अखेर काँग्रेसने मौन सोडले; पक्ष फोडण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो

पत्रकार परिषदेत दिनेश गुंडू राव यांचे भाजपवर आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी (Panaji): मायकेल लोबो यांची गोव्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आल्याचे AICC गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान ते पुढे म्हणाले, काँग्रेस फोडण्यासाठी भाजपने किती पैसा फेकला हे मी सांगू शकत नाही, दिनेश गुंडू राव यांनी भाजपवर आरोप केले.

(Dinesh Gundu Rao slams bjp over congress MLA politics Michael Lobo digambar kamat news in Goa)

मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली असुन, दिगंबर कामत यांनी पाठीत खंजीर खुपसला अशी खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान दोन्ही नेत्यांवर कारवाई होणार असा इशारा दिनेश गुंडू राव यांनी दिला. सध्या काँग्रेसकडे 6 आमदार. इतर आमदारांनी विचार करून पक्षात परतावे असे आवाहन अमित पाटकर यांनी केले. राज्यात सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. (Political News Update)

दिनेश गुंडू राव, काँग्रेसचे गोवा प्रभारी

"आमचे किमान 8 आमदार निघून जावेत यासाठी भाजप 2/3 विभाजनाचा प्रयत्न करत होता. आमच्या अनेक लोकांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. ऑफर केलेल्या रकमेने मला धक्का बसला आहे. पण आमचे 6 आमदार ठाम राहिले, मला त्यांचा अभिमान आहे"

ते पुढे म्हणाले नवा नेता निवडला जाईल. या पक्षांतराच्या विरोधात कायद्याने जी काही कारवाई करावी लागेल, ती पक्षविरोधी काम करेल. बघू किती लोक राहतील. आमचे 5 आमदार येथे आहेत, आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील

काँग्रेस पक्ष निराश होणार नाही, कमकुवत होणार नाही. हा मुद्दा आम्ही अधिक आक्रमकपणे मांडू. सत्तेसाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी 2 जणांनी केलेला हा विश्वासघात आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू असे ते म्हणाले. (Goa Marathi News)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

Goa Crime: नाक दाबले अन् जीव घेतला... डिचोलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू नव्हे, तर खूनच! आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

World Cup 2026 Squad: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ

SCROLL FOR NEXT