Dilip Parulekar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: विरोध केल्यास 'त्‍यांना' माघारी पाठवणार आहे का?

Dilip Parulekar: नवीन घडामोडीमुळे आपल्याला कुठलीच अडचण नाही.

दैनिक गोमन्तक

Mapusa: काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपने पक्षात सामावून घेताना जुन्या कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण दिलेले आहे. मुळात याबाबत आम्ही काही बोलल्यास ते आता गृहीत धरले जाणार नाही. मग बोलून काय उपयोग? आम्ही विरोध केला म्हणून आलेल्यांना माघारी पाठविले जाणार आहे का? असे सवाल साळगावचे माजी आमदार दिलीप परुळेकर यांनी उपस्‍थित केले. तसेच नवीन घडामोडीमुळे आपल्याला कुठलीच अडचण नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. काल ते माध्यमांशी बोलत होते.

विलिनीकरणासारखे निर्णय घेताना अनेकदा लहान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. असे निर्णय उच्चस्तरीय व पक्षश्रेष्ठी पातळीवर होतात. मध्यंतरी काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्‍ये आले. नंतर ते पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले. मात्र, त्यामधील कितीजण जिंकले व कितीजण पराभतू झाले, हे जनतेस माहिती आहे, असेही ते म्‍हणाले.

मी पक्षाचा प्रामाणिक बूथ कार्यकर्ता असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते भाजपचे नेतृत्व करताहेत. मोदींमुळे पक्षाचा, देशाचा मोठा विकास झाला आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. मोदींनी जागतिक नेता म्हणून नावलौकीक मिळविला आहे. त्‍यांच्‍यासाठी माझी आजन्म बूथ कार्यकर्ता म्हणून राहण्याची तयारी आहे, असे परुळेकर म्‍हणाले.

दिलीप परुळेकर, माजी मंत्री-

मागील 30 वर्षे मी प्रामाणिकपणे भाजपसाठी काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिले असून, त्यामध्ये आपण सक्रिय आहे. ज्या लोकांनी पक्षांतर केले, त्यांचे जुने व्हिडिओ सध्या व्हायरल होताहेत. मात्र, माझा तसा एकही व्हिडिओ नाही. आपण पक्षविरोधी काम कधीच केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT