Goa Crime News |  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: मृताच्‍या हातात लोखंडी प्‍लेट नव्‍हती; दिलीप नाईक खुनाचा झाला उलगडा!

Goa Crime News: डॉ. मधू घोडकिरेकर : 13 वर्षांपूर्वी मोले जंगलात घडविले होते अग्निकांड

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

Goa Crime News: एप्रिल 2011 मध्‍ये मोलेच्‍या जंगलात एका जीपमध्‍ये जळून कोळसा झालेल्‍या अवस्‍थेत एक मृतदेह सापडला होता. त्‍यामुळे त्‍याची ओळख पटणे शक्‍य नव्‍हते. ज्‍या जीपमध्‍ये हा मृतदेह सापडला, ती जीप पर्ये येथील जनार्दन कोकरे याच्‍या मालकीची होती. त्‍यामुळे तो मृतदेह कोकरे याचाच असावा असा तर्क मोले पोलिसांनी काढला होता.

मात्र कोकरे याला पूर्वी अपघात झाल्‍याने त्‍याच्‍या हाताचे हाड सांधण्‍यासाठी पोलादी प्‍लेट बसवली होती. ज्‍या मृतदेहाचा पोस्‍टमार्टम करण्‍यात आले, त्‍या मृतदेहाच्‍या हातात अशी कुठलीही प्‍लेट नव्‍हती. या एकाच गोष्‍टीवरुन तो मृतदेह कोकरे याचा नसून अन्‍य दुसऱ्या कुणाचा तरी असावा हे निश्‍चित झाले व त्‍यातूनच दिलीप नाईक याच्‍या गूढ खूनाचा उलगडा झाला.

प्रसिद्ध फॉरेन्‍सिकतज्‍ज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांनी तब्‍बल 11 वर्षांनी ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात या खुनाच्‍या घटनेला उजाळा दिला. ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी त्‍यांची मुलाखत घेतली.

डॉ. घोडकिरेकर म्‍हणाले, पूर्वी एकदा मी पर्ये येथे एका मंदिराच्‍या उद्‍घाटन समारंभाला गेलो असता, मला त्‍या मंदिर समितीचे खजिनदार असलेले कोकरे यांच्‍या हाताला फ्रॅक्‍चर होऊन हाताचे हाड मोडल्याने ते सांधण्‍यासाठी पोलादी प्‍लेट बसविली होती अशी माहिती कुणीतरी दिली होती. ही गोष्‍ट माझ्‍या ध्‍यानात होती.

त्‍यामुळेच कोकरे याचा तो कथित मृतदेह पोस्‍टमार्टमसाठी आणला आहे याची माहिती मिळाल्‍यावर शवचिकित्‍सा करणाऱ्या डॉक्‍टरला मी ही गोष्‍ट सांगितली. मृताच्‍या हातात पोलादी प्‍लेट आहे का हे बघा, अशी सूचना केली. पण त्‍या मृताच्‍या हाताला पोलादी प्‍लेट नव्‍हती. त्‍यामुळेच हा मृतदेह दुसऱ्याचा कुणाचा तरी असावा ही शक्‍यता पुढे आली. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे मृतदेहाचा डीएनए कोकरे याच्‍या आप्‍तांशी जुळत नसल्‍यामुळे नंतर पक्की खात्रीही झाली.

10 एप्रिल 2011 रोजी हा खून झाला होता. विम्‍याची भली मोठी रक्‍कम आपल्‍या पत्‍नीला मिळावी या उद्देशाने जनार्दन कोकरे याने आपल्‍याच गावातील काहीसा बुद्धीने मंद असलेल्‍या दिलीप नाईक याला आपल्‍या गाडीत बसवून त्‍याचे अपहरण केले होते. त्‍यानंतर त्‍याचा खून करून आपल्‍याच जीपमध्‍ये तो मृतदेह ठेवून गाडीला आग लावली होती,

जेणेकरून तो मृत्‍यू आपलाच असल्‍याचे सिद्ध होऊन विम्‍याची रक्‍कम आपल्‍या बायकोला मिळावी यासाठी त्‍याने हा कट रचला होता. त्‍यानंतर तत्‍कालीन दक्षिण गोवा सत्र न्‍यायाधीश नूतन सरदेसाई यांनी कोकरे याला खुनाच्‍या गुन्‍ह्याखाली दोषी ठरवून जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी केला होता.

‘मृतात्‍मे तुमच्‍याशी बोलतात का?’ डॉ. घोडकिरेकर यांना हा प्रश्‍‍न विचारला असता, मृतात्‍मे माझ्‍याशी बोलत नाहीत, मात्र या घटनांशी संबंधित असलेल्‍या लोकांच्‍या तोंडातून मला ज्‍या गोष्‍टी कळतात त्‍यातूनच अशी प्रकरणे तडीस लागतात, असे ते म्‍हणाले. एका अर्थी ते मृतात्‍मे या माणसांच्‍या तोंडून माझ्‍याशी बोलत असावेत. मी फक्‍त त्‍यांचे म्‍हणणे लक्षपूर्वक ऐकतो एवढेच.

पायाच्‍या वाकड्या अंगठ्यावरून पटली मृत सलीमाची ओळख

अलीकडेच वास्‍को समुद्रात खून करून टाकून दिलेल्‍या पद्मलोचन सलीमा (२१) या ट्रॉलरवरील कामगाराच्‍या खुनाचा छडा डॉ. घोडकिरेकर यांनी त्‍याच्‍या पायाच्‍या अंगठ्याच्‍या वाकड्या बोटावरुन लावला होता. त्‍यामुळे सध्‍या त्‍यांचे नाव चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. घोडकिरेकर यांची मुलाखत घेतली असता, या प्रकरणात आपल्‍याला सलीमा याच्‍या वडिलाने माहिती देऊन मला बहुमोल मदत केली.

पायाच्‍या वाकड्या अंगठ्यावरून पटली मृत सलीमाची ओळख

अलीकडेच वास्‍को समुद्रात खून करून टाकून दिलेल्‍या पद्मलोचन सलीमा (२१) या ट्रॉलरवरील कामगाराच्‍या खुनाचा छडा डॉ. घोडकिरेकर यांनी त्‍याच्‍या पायाच्‍या अंगठ्याच्‍या वाकड्या बोटावरुन लावला होता. त्‍यामुळे सध्‍या त्‍यांचे नाव चर्चेत आहे.

याच पार्श्वभूमीवर डॉ. घोडकिरेकर यांची मुलाखत घेतली असता, या प्रकरणात आपल्‍याला सलीमा याच्‍या वडिलाने माहिती देऊन मला बहुमोल मदत केली. आपल्‍या मुलाच्‍या अंगावरील खुणांची त्‍यांनी तपशीलवार माहिती दिली. त्‍यामुळेच हा मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून तो सलीमा याचाच आहे या निष्‍कर्षापर्यंत आम्‍ही पोहोचू शकलो असे घोडकिरेकर यांनी सांगितले.

पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करावा

अशा गूढ प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी काय खबरदारी घ्‍यायला पाहिजे, असे विचारले असता, कुठल्‍याही खुनाचा तपास करताना परिस्‍थितीजन्‍य पुरावे काय आहेत याची पोलिसांनी बारकाईने तपासणी केली पाहिजे, असे डॉ. घोडकिरेकर म्‍हणाले.

फक्‍त मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्‍ही यावरून सगळ्‍याच खून किंवा गुन्‍ह्यांना वाचा फुटेल या भ्रमात पोलिसांनी न राहता सर्व बाजूंनी तपास करायला हवा. कुठल्‍याही अपमृत्‍यू प्रकरणाचा तपास करताना घटनास्‍थळी जाऊन पाहणी केली पाहिजे. प्रकरण कितीही साधे दिसले तरी त्‍याला दुसरा कोन असू शकतो याची शक्‍यता गृहित धरूनच तपास करणे योग्‍य असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT