Goa Government: राज्याने उद्योग धोरण राबविणे गरजेचे

Goa Government: सडेतोड नायक : उद्योगांवरील कर कमी करणे गरजेचे असल्याचे उद्योजकांचे मत
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: राज्यात उद्योगवाढीसाठी राजकीय ताकद आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत होणे गरजेचे आहे. राज्याने केवळ धोरण बनविले म्हणून होत नाही तर ते उत्तमपणे राबविणेदेखील तितकेच गरजेचे असते,

Goa Government
Subhash Shirodkar: नियमित अनुदान हा शेतकऱ्यांचा हक्कच; जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

असे प्रतिपादन उद्योजक दामोदर कोचकर यांनी केले. ते गोमन्तक टीव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष चर्चासत्रात बोलत होते.

या चर्चासत्रात कोचकर यांच्यासोबत उद्योजक मांगिरिष पै रायकर व उद्योजक महेंद्र खांडेपारकर यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, कोचकर म्हणाले की, सरकार आता उद्योगवाढीसाठी पुढाकार घेत आहे.

ईडीसी, आयडीसीदेखील उत्तम कार्य करत आहे. परंतु याबाबतीत काही काळ निश्‍चितपणे लागणार आहे. ज्यावेळी परदेशात बसून एखाद्या उद्योजकाला गोव्यात आपला उद्योग करता येईल, त्यावेळी गोव्याची उद्योगाच्या अनुषंगाने उन्नती होईल.

गोव्यात उद्योगांना होतो विरोध

उद्योगांचा कर कमी असणे गरजेचे आहे; कारण रोजगार आणि महसूल निर्मितीत उद्योग महत्त्वाची भूमिका निभावतात. राज्यात काही ठिकाणी कर मोठ्या प्रमाणात आकारले जातात. गोव्याला आता ‘म्हाका नका’ स्टेट संबोधले जाते.

येथे आलेल्या प्रत्येक उद्योगांना विरोध होतो. राज्यातील उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारला साहाय्य करण्यास आम्ही तयार आहोत. उद्योग क्षेत्रातील जाणकारांची एक समिती तयार करावी. गोव्यात उद्योग आणण्यासाठी प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासदेखील आम्ही तयार असल्याचे मांगिरिष पै रायकर यांनी सांगितले.

इंडस्ट्रीचा हाऊस टॅक्स वाढला

सरकार उद्योगांसाठी सिंगल विंडो राबवत असल्याचे सांगते; परंतु मला कोठेच तसे दिसत नाही. या ऑनलाईन पद्धतीमुळे काम अधिक प्रमाणात ऑफलाईन झाले आहे. इंडस्ट्रीच्या हाऊस टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे.

जर ५ हजार स्क्वेअर मीटरमध्ये उद्योग असेल तर 10 लाख रुपये कर भरावा लागतो. जो प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गोव्यात माल आयात करण्याची सुविधा चांगली आहे. गोव्यात आज आयटी पार्कची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन महेंद्र खांडेपारकर यांनी केले.

Goa Government
Breast Cancer: भीषण वास्तव! गोव्यात 1 लाखात 55 महिलांना स्‍तनाचा कर्करोग...

उद्योग परिषदांची भूमिका महत्त्वाची

राज्य सरकार आता उद्योग वाढविण्यात रस दाखवत असून अशा राज्यात होऊ घातलेल्या परिषदा या गोव्याच्या उद्योगाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सरकार आता उद्योग वाढीसाठी अतिशय गंभीरपणे पावले उचलत असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, ‘आयडीसी’ चेअरमन, प्रशासकीय अधिकारी (एमडी) एकत्र येऊन ज्यापद्धतीने कार्य करत आहेत. जी पारदर्शकता आणू पाहतात, ती पाहता भविष्यात राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील, असे दामोदर कोचकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com