Digitization of Books  Canva
गोवा

Digitization of Books: गोव्यातील दुर्मिळ दस्तावेज होणार 'डिजिटल'! 8 लाख पानांचे काम पूर्ण; चाळीस हजार पुस्तकांचे संवर्धन

Krishnadas Shama State Central Library: जुन्या दुर्मिळ पुस्तकांचे संवर्धन व्हावे, जुना ज्ञानाचा खजिना अबाधित रहावा, जुन्या वृत्तपत्रांचेही डिजिटल स्वरूपात सुरक्षित रहावीत यासाठी कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालयातील दस्ताऐवजांच्या डिजिटलायजेशनचे काम सुरू असून आतापर्यंत सुमारे ८ लाख पानांचे डिजिटालयजेशनचे काम पूर्ण झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Digitization of Books At Krishnadas Shama State Central Library

पणजी: गोव्यात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी. जुन्या दुर्मिळ पुस्तकांचे संवर्धन व्हावे, जुना ज्ञानाचा खजिना अबाधित रहावा, जुन्या वृत्तपत्रांचेही डिजिटल स्वरूपात सुरक्षित रहावीत यासाठी कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालयातील दस्ताऐवजांच्या डिजिटलायजेशनचे काम सुरू असून आतापर्यंत सुमारे ८ लाख पानांचे डिजिटालयजेशनचे काम पूर्ण झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

सदर काम दोन मोठ्या स्कॅनरद्वारे करण्यात येत असून येत्या काही दिवसांत डिजिटलायजेशनसाठी आणखी एका स्कॅनर आणला जाणार आहे. केंद्र सरकारने करण्यात आलेल्या आर्थिक मदतीतून माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळातंर्गत या डिजिटलायजेशनचे काम सुरू आहे. मागील सहा महिन्यांपासून हे काम सुरू असून पुढेही सुरू राहणार आहे. आतापर्यंत सुमारे १० टक्के डिजिटलायजेशनचे काम पूर्ण झाले असून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पोर्तुगीजपूर्वकालीन पुस्तकांचे जतन

कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालयात पोर्तुगीजकालीन तसेच पोर्तुगीजपूर्व काळातील सुमारे ४० हजार दुर्मिळ पुस्तके आहेत. डिजिटालयजेशनद्वारे त्यांचे संवर्धन करत हा खजिना येणाऱ्या पिढ्यांसाठी डिजिटल स्वरूपात अबाधित राखण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. त्यासोबतच गोव्यात पोर्तुगीज काळात प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे, मुक्तीनंतरची वृत्तपत्रे जी गोव्याचा सामाजिक, राजकीय इतिहास कथन करतात त्यांचेही डिजिटलायजेशन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

केंद्राकडून ७४ कोटींचा निधी

केंद्र सरकारकडून वाचनालयांचा विकास करण्यासाठी सुमारे ७४ कोटी रूपये देण्यात आले असून या निधीच्या माध्यमातून वाचनालयांचे अद्ययावतीकरण, नवीन वाचनालये, दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायजेशनन, डिजिटल वाचनालय, हरित वाचनालय आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT