digital heritage museum Dainik Gomantak
गोवा

Digital Museum: पाहा छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन 'डिजिटल' स्वरूपात; फर्मागुडीत उभारणार 125 कोटींचे भव्य संग्रहालय

Shivaji Maharaj digital museum: फर्मागुडी, फोंडा येथे साकारल्या जाणाऱ्या या १२५.५९ कोटी रुपयांच्या सांस्कृतिक प्रकल्पाची घोषणा गोवा सरकारने केली

Akshata Chhatre

फोंडा: गोव्यात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य डिजिटल संग्रहालय उभारले जाणार आहे. फर्मागुडी, फोंडा येथे साकारल्या जाणाऱ्या या १२५.५९ कोटी रुपयांच्या सांस्कृतिक प्रकल्पाची घोषणा गोवा सरकारने केली. या संग्रहालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे कार्य डिजिटल स्वरूपात पुन्हा जिवंत केले जाणार आहे.

केंद्र आणि राज्याच्या संयुक्त प्रयत्नातून प्रकल्प

शनिवार (दि.३१) पत्रकार परिषदेत बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ९७.४६ कोटी रुपयांची भरीव रक्कम मंजूर केली आहे. तर, उर्वरित २८.१३ कोटी रुपयांचे योगदान गोवा राज्य सरकार देणार आहे. या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

मार्च-एप्रिल २०२६ पर्यंत उद्दिष्ट

पर्यटन मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हा प्रकल्प पूर्ण होण्याची वेळमर्यादाही जाहीर केली. मार्च-एप्रिल २०२६ पर्यंत हे डिजिटल संग्रहालय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या संग्रहालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व, प्रशासकीय कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातील. विशेषतः, युवा पिढीला महाराजांच्या प्रेरणादायी जीवनातून आणि कार्यातून खूप काही शिकता येईल, असे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

गोव्यासारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे डिजिटल संग्रहालय उभारणे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल आणि गोव्याच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

Goa Live Updates: गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

SCROLL FOR NEXT