Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Goa: पारदर्शक कारभारासाठी आता डिजिटल पद्धत अत्यावश्‍यक!

माविन गुदिन्हो : अनेक पंचायतींमध्ये युवा सदस्यांचा समावेश

दैनिक गोमन्तक

पणजी: पंचायत निवडणुकीत यंदा मोठ्या संख्येने युवा पंचसदस्य निवडून आले आहेत. युवा वर्ग पोटतिडकीने काम करणार याबाबत दुमत नाही.पंचायतींचा कारभार पारदर्शक करायचा असेल, तर तो डिजिटल पद्धतीने वाढवण्याची गरज आहे, असे मत पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले. पर्वरी येथे विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी होते.

(Digital mode is now essential for transparent governance in goa)

पंचायतींचा कारभार डिजिटल पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहे. त्यात अर्ज ई - मेलद्वारे पाठवण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे. यासाठी खात्याला निर्देशदिले आहेत.अधिकाऱ्यांनी पंचसदस्यांसोबत समन्वय करून ही प्रक्रिया चालीस लावण्याची आवश्‍यकता आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

नवीन पंचसदस्यांमध्ये जास्त युवा वर्ग असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात त्यांचा कल असतो, त्यासाठी ही गोष्ट चांगली आहे. त्यांच्याकडून ही जबाबदारी पेलणार नाही, हा निकर्ष आताच लावणे चुकीचे आहे. त्यांना एक संधी दिली पाहिजे, असे आवाहन गुदिन्हो यांनी केले.

राज्‍यात अतिवेगाने वाहन चालवण्याचे प्रकारामुळे अपघात होत असून, त्यासाठी कॅमेरे बसवण्याचा विचार सुरू आहे. आता त्यासाठी खाजगी व्यक्तींना कॅमेरे बसवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांना पुरवण्याचे काम सोपवले जाईल. यासाठी त्यांचे कमिशनदेखील त्यांना दिले जाईल.

- माविन गुदिन्हो, वाहतूक मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT