पणजी: फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे निवृत्तीवेतनधारकांसाठी हयातीचा दाखला सादर करणे सुलभ करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग या महिन्यात राष्ट्रव्यापी डिजिटल हयात प्रमाणपत्र (डीएलसी) मोहीम 3.0 राबवत आहे. निवृत्तीवेतनधारकांना अँड्रॉइड स्मार्टफोनवर आधार ओळखपत्राद्वारे प्रमाणपत्रे दाखल करण्यास ही पद्धत फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव दीपक गुप्ता निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विविध डिजिटल पद्धतींचा वापर करण्यास मदत करण्यासाठी या शिबिरांना भेट देणार आहेत.
या शिबिरांमध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण निवृत्तीवेतनधारकांना त्यांची आधार नोंद अद्ययावत करण्यासाठी आणि तांत्रिक समस्या उद्भवल्यास आवश्यक ती मदत करणार आहे. दरम्यान, गुप्ता हे मंगळवार, 12 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मडगाव आणि फोंडा शाखेत होणाऱ्या शिबिरासही भेट देणार आहेत.
यापूर्वी निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन वितरण प्राधिकरणांना भेट द्यावी लागत होती, जे अनेकदा वृद्ध व्यक्तींसाठी आव्हानात्मक होते. 2014 मध्ये, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) आणि 2021 मध्ये, फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान सुरू केले. तंत्रज्ञानातील या प्रगतीमुळे बायोमेट्रिक उपकरणांची गरज दूर झाली आणि ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली.
2022 मध्ये निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने 37 ठिकाणी मोहिमेचे आयोजन केले होते. 1.41 कोटी ‘डीएलसी’ तयार केले. 2023 मध्ये ही मोहीम 100 ठिकाणी पार पडली आणि 1.47 कोटींपेक्षा जास्त ‘डीएलसी’ तयार झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.