Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : मुख्यमंत्री गोव्यात परतले, दिगंबर मात्र दिल्लीतच का राहिले?

आता दिगंबर कामत नेमके कोणत्या कारणासाठी दिल्लीतून परतले नाहीत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat : आठपैकी सात बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, बहुप्रतिक्षित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ते व्यस्त असल्याने झालीच नाही. पुढील वेळी त्यांना भेटू, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले.

या राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे, खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह आमदार राजेश फळदेसाई, सिक्वेरा आणि फर्नांडिस गोव्यात परतले आहेत. तर दिगंबर कामत यांच्याबरोबर केदार नाईक, दिलायला लोबो आणि संकल्प आमोणकर हे चौघे त्यांच्या खासगी कामानिमित्त दिल्लीतच आहेत. मात्र आता दिगंबर कामत नेमके कोणत्या कारणासाठी दिल्लीतून परतले नाहीत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

दिगंबर कामत यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. मात्र हे मंत्रिपद कामतांना देण्यात आल्यास त्यांना नगरनियोजन व खाण अशी खाती मिळू शकतात. राज्यातील खनिज उद्योजकांनी कामत यांच्या बाजूने जोर लावला आहे. शिवाय गुजरातमधील काही उद्योगपतीही त्यांच्‍या मागे उभे असल्याचे चित्र आहे. हे फेरबदल लागलीच घडल्यास गोवा सरकारचा तोल ढळू शकतो, अशी चर्चा भाजपामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक नेते अस्वस्थ आहेत.

असं असलं तरीही अमित शहा आणि नड्डा यांच्या बैठकीमध्ये कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे व अन्य कोणती लाभाची पदे द्यायची याबाबत कसली चर्चा झाली नाही. त्यामुळे सध्यातरी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार नाहीत. पण बंडखोरांपैकी काहींना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. मात्र नव्याने दाखल झालेल्या या आमदारांना राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी गोव्यातल्या लोकसभेच्या दोन्ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकाच, असे सांगितले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व नियोजन करावे, अशीही सूचना केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेली राष्ट्रीय नेत्यांची ही भेट काही मिनिटांचीच झाली. त्या भेटीमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी नव्याने भाजपमध्ये आलेल्या आमदारांना पक्ष वाढवा, पक्षासाठी काम करा असा सल्ला दिला.

मायकल लोबो या सात आमदारांसोबत राष्ट्रीय नेत्यांना भेटणार होते. मात्र, ते मित्राच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. ते परस्पर दिल्लीला येणार होते. ते आज पोहोचू शकले नाहीत. मात्र, त्यांच्या पत्नी दिलायला या उपस्थित होत्या. त्यांच्या अनुपस्थितीबाबतही सध्या गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT