Margao Garbage Problem | Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Margao Garbage Problem: कचरा समस्येवर मे महिन्याच्या आसपास तोडगा काढू; दिगंबर कामतांचे आश्वासन

गोव्यात कचरा समस्येने सरकारची डोकेदुखी वाढवली आहे.

दैनिक गोमन्तक

Margao Garbage Problem: गोव्यात कचरा समस्येने सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. ही समस्या संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी शुक्रवारी विश्वास व्यक्त केला की, व्यापारी राजधानी असलेल्या शहरातील कचऱ्याच्या समस्येवर मे महिन्याच्या आसपास काहीतरी परिणाम दिसून येईल.

कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून कामत म्हणाले की, सरकार कुडचडे कचरा प्रक्रिया प्रकल्प देखील सुरू करणार आहे. ते म्हणाले, “निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला कुडचडे प्लांटच्या कचऱ्याची आवश्यकता पाहावी लागेल.”

प्रस्तावित दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची किंवा इतर उपायांची निवड करण्याबाबत गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि गोवा राज्य नागरी विकास संस्था (GSUDA) ठरवतील असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

मात्र, मडगाव नगरपालिकेने सुक्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढला आहे, असे सांगून ते म्हणाले की, सोनसोडो डंपची दुरुस्ती जवळपास पूर्ण झाली आहे. GWMC ने सोनसोडो येथून RDF च्या वाहतुकीसाठी एक टाइमलाइन सेट केली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गोव्यात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिका आपल्या क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT