Vijay Sardesai: ड्रग्स प्रकरणांमध्ये राजकारणी, गुन्हेगारांचे लागेबांधे : सरदेसाई

लक्तरे चव्हाट्यावर : हैदराबाद पोलिसांकडून धक्कादायक टिप्पणी
Vijay Sardesai Latest News
Vijay Sardesai Latest NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Sardesai राज्य सरकार गोव्यातून ड्रग्सचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा करत असले तरी हैदराबाद पोलिसांनी गोव्यातील ड्रग्स व्यवहाराविषयी केलेली टिप्पणी धक्कादायक आहे. पर्यटनाच्या नावाखाली हे सरकार ड्रग्स व्यापाराला छुपा पाठिंबा देत आहे.

हे सरकार महसुलासाठी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रग्स व्यापारामध्ये राजकारणी व गुन्हेगारांचे लागेबांधे असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

पणजीतील पत्रकार परिषदेत आमदार सरदेसाई म्हणाले की, हैदराबादचे पोलिस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी गोव्यातील ड्रग्स व्यवहाराची पोलखोल केली आहे. त्यांनी सरकार व ड्रग्स दलाल यांच्यातील लागेबांधे उघड करताना गोव्यातील सरकार त्यांना कधीच सहकार्य करत नाही.

ड्रग्सविरोधात कारवाई केली तर त्याचा राज्यातील पर्यटनावर परिणाम होईल, असे सांगण्यात आले, ही स्थिती भयावह आहे.

Vijay Sardesai Latest News
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात लॉंग ड्राईव्हला जायचंय? टाकी फुल्ल करण्याआधी वाचा पेट्रोल-डिझेलचे दर

विरोधकांचे काम हलके

व्यावसायिकांकडून खंडणी वसूल केली जाते, असे सत्ताधारी पक्षाचे आमदार मायकल लोबो म्हणतात, हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल सरदेसाई यांनी केला. सध्या भाजपमध्ये इतके आमदार बाहेरून घेतले आहेत की, विरोधकांची भूमिका तेच निभावत आहेत. त्यामुळे विरोधकांचे काम हलके झाले आहे, असा टोमणाही सरदेसाई यांनी यावेळी हाणला.

Vijay Sardesai Latest News
Panaji News : सांघिकतेने आव्हानांवर मात शक्य

...असा होतो फाईलचा प्रवास

  • 2020 साली गोव्यात गांजा कायदेशीर करण्याच्या हालचालींचा पर्दाफाश केला होता.

  • त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जानेवारी २०२१ मध्ये हा प्रस्ताव रद्द केल्याचे उत्तर विधानसभेत दिले होते.

  • सप्टेंबर 2022 मध्ये आरोग्य विभागाला ‘आरटीआय’नुसार पत्र पाठवले, तेव्हा उत्तर मिळाले की, या प्रकरणाची फाईल सल्ल्यासाठी कायदा विभागाकडे आहे.

  • कायदा विभागाकडे आरटीआय अर्ज दाखल केला तेव्हा उत्तर मिळाले की, ही फाईल विचारार्थ प्रलंबित आहे.

  • गोवा फॉरवर्डने आरोग्य आणि कायदा विभागाच्या सचिवांना पत्र लिहिले, तेव्हा दोघांनीही उत्तर न देणे पसंत केले, अशी माहिती आमदार सरदेसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
Baga beach viral video
Mirabag Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com