Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: कामत, तवडकरांना गणेश चतुर्थीनंतरच खाती; मंत्री, नेते गणेशोत्सवात व्यग्र; समर्थकांमध्ये वाढली उत्सुकता

Goa Cabinet Reshuffle: गेल्‍या गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्‍या दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोन्‍ही नवनियुक्त मंत्र्यांना गणेश चतुर्थीनंतरच खात्‍यांचे वाटप केले जाईल

Sameer Amunekar

पणजी: गेल्‍या गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्‍या दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोन्‍ही नवनियुक्त मंत्र्यांना गणेश चतुर्थीनंतरच खात्‍यांचे वाटप केले जाईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी मंगळवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

गत लोकसभा निवडणुकीपासून चर्चा सुरू असलेल्‍या राज्‍य मंत्रिमंडळात गेल्‍या गुरुवारी फेरबदल झाला. भाजपने ज्‍येष्‍ठ आमदार दिगंबर कामत आणि सभापतिपदी असलेल्‍या रमेश तवडकर यांची मंत्रिपदी वर्णी लावली. परंतु, या दोघांचा शपथविधी होऊन सहा दिवस उलटले तरी त्‍यांना अजून खात्‍यांचे वाटप करण्‍यात आलेले नाही.

त्‍यामुळे राजकीय वर्तुळातून आश्‍‍चर्य व्‍यक्त करण्‍यात येत आहे. या दोन्‍ही नवनिर्वाचित मंत्र्यांनी शपथ घेतल्‍यानंतर पुढील दोन दिवस अमावास्‍या होती. हिंदू धर्मात अमावास्‍येला चांगली कामे केली जात नाहीत.

त्‍यामुळे आम्‍हाला सोमवारी खातेवाटप करावे, अशी मागणी दोन्‍ही मंत्र्यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली होती. त्‍यामुळे सोमवारी खाती मिळतील, असे वाटत होते. परंतु, सोमवारीही खातेवाटप झाले नाही. गणेशोत्‍सवास बुधवारपासून सुरुवात होणार होती. त्‍यामुळे मंगळवारी खात्‍यांचे वाटपाची शक्‍यता होती. तीही फोल ठरली. आता बुधवारपासून पुढील पाच दिवस चतुर्थीच्‍या धामधुमीत असतील. त्‍यामुळे कामत, तवडकरांना चतुर्थीनंतरच खाती मिळतील, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

केबिनचा ताबा चतुर्थीनंतरच : कामत

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडून सोमवारी खात्‍यांचे वाटप होण्‍याची शक्‍यता होती. त्‍यामुळे मंत्री रमेश तवडकर यांनी सोमवारीच मंत्रालयातील आपल्‍या केबिनचा ताबा स्‍वीकारला होता.

परंतु, दिगंबर कामत यांनी मात्र अजून आपल्‍या केबिनचा ताबा स्‍वीकारलेला नाही. चतुर्थीनंतरच आपण आपल्‍या केबिनचा ताबा स्‍वीकारणार असल्‍याचे कामत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले असल्‍याने नव्‍या मंत्र्यांना खात्‍यांचे वाटप चतुर्थीनंतरच होईल, या शक्‍यतेस बळकटी मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, तर खबरदार..! मुख्यमंत्र्यांनी दिला सज्जड इशारा

Goa: राज्यात दरवर्षी 450 व्‍यापारी परवाने होतात रद्द, जीएसटी न भरण्‍याचा परिणाम, जमा न करणाऱ्यांविरोधात कारवाई

Goa Weather Update: नवरात्रोत्‍सव काळात पावसाचे 'विघ्‍न' नाही! गेल्‍या 24 तासांत राज्‍यात पावसाची नोंद नाही

IND vs PAK: शाहीन-हॅरिससोबत का भिडला अभिषेक शर्मा? सामन्यानंतर सांगितली पाकड्यांची संपूर्ण कहाणी Watch Video

GST Reforms 2025: 'आजपासून जीएसटीचे नवे दर लागू'; खाद्यपदार्थ, कपडे ते फ्रीजसह रोजच्या वापरातील 'या' वस्तू झाल्या स्वस्त

SCROLL FOR NEXT